
गोंदिया,दि.13 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील
विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज 13 जानेवारी रोजी प्राप्त
अहवालात जिल्ह्यात नवीन 120 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर
आज डिस्चार्ज रुग्णांची संख्या 10 आहे.
आजपर्यंत 41,911 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. 40,591
रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील
बाधित रुग्णांची संख्या 605 आहे. क्रियाशील असलेल्या बाधित रुग्णांपैकी
557 रुग्ण घरीच अलगीकरणात आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील 578 रुग्णांचा
मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे
प्रमाण 96.84 टक्के आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1.4 टक्के आहे तर
डब्लिंग रेट 11.6 दिवस आहे.
गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विषाणू संशोधन व
निदान प्रयोगशाळेत कोरोना विषाणूच्या तपासणीसाठी आतापर्यंत 482873 नमूने
पाठविण्यात आले. यामध्ये RT-PCR चे 256272 नमूने असून रॅपिड अँटीजेन
चाचणी (RAT) चे 226601 नमूने आहेत.