
*आदर्श संविधान संस्कृति जनमाणसात रुजविण्यासाठी संविधान मैत्री संघ, आम्ही सिद्ध लेखिका, बिरसा क्रांती दल, एम.जी.पैरामेडिकल कॉलेज, म.रा.अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने…
*गोंदिया:* गणराज्य भारतात समता स्वतंत्रता बंधुता अबाधित व कायम राखण्यासाठी नागरिकांनी प्रजासत्ताक दिन व स्वतंत्रता दिन याचे फरक व महत्व जाणुन घेणे गरजेचे आहे. 26 जानेवारी गणतंत्र दिन म्हणजे फक्त वीर-हुतात्मा यांचा स्मरणाचा दिन नव्हे तर भारतीय संविधानाचा गौरव- सन्मान करण्याचा हा दिवस आहे. विविध जाती धर्म समुदाय मध्ये बाटलेल्या समाजाला समता स्वतंत्रता बंधुता न्याय या मानवीय मूल्याच्या आधारे देशातील प्रबुद्ध नागरिक म्हणून “संविधान” सामाजिक सलोखा राखून बंधुभावाने जगने शिकविते। अशी आदर्श संविधान संस्कृति जनमाणसात रुजविण्यासाठी गणतंत्र दिनाचे औचित्य साधुन संविधान मैत्री संघ, आम्ही सिद्ध लेखिका, बिरसा क्रांती दल, एम.जी.पैरामेडिकल कॉलेज, म.रा.अंधश्रद्धा निर्मूलन समिती गोंदिया जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने “संविधान का सम्मान जागृती उपक्रम” ऑफलाइन व ऑनलाइन दोन्ही पद्धतीने जिल्ह्यात राबविण्यात आला।
या उपक्रमा अंतर्गत ऑफलाइन संविधान गौरव प्रतियोगीता परीक्षा, महामानवांच्या मानवतावादी जीवनसंघर्षावर ऑनलाइन एकांकिका स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, “बाबासाहेबांनी तरतूद केलेले महिलांचे घटनादत्त अधिकार” या विषयावर वक्तृत्व स्पर्धा ऑनलाइन आयोजित करण्यात आले होते। आयोजित स्पर्धेत विजेत्यांसह सहभागी सर्व स्पर्धकाना प्रोत्साहन बक्षीस देऊन प्रोत्साहित करण्यात आले. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन प्रा.डॉ. दिशा गेडाम (अध्यक्ष-आम्ही सिद्ध लेखिका), प्रमुख अतिथि म्हणून मालती किन्नाके (जिल्हाध्यक्ष बिरसा क्रांति दल) , मुख्याध्यापिका उमा गजभिये बिंदू कोडवते ,हेमलता अहाके, कविता कोळवती, प्रणिता कुंभारे, भारती किरणापुरे, आभा मेश्राम, वरिष्ठ नागरिक म्हणून वसंत गवळी, मनसर गोंडाने, एम.जी. पैरामेडिकल कॉलेज प्रशासनातर्फे डायरेक्टर अनिल गोंडाने, प्राचार्य अनुसूया लिल्हारे, प्रा. छाया राणा, प्रा. शारदा चौधरी, प्रा. प्रीति वैद्य, प्रा.ललित ढबले, प्रा.आरती चौधरी, प्रा. दिगंबर रहांगडाले, राजू रहांगडाले, योगेश्वरी ठवरे, संविधान मैत्री संघाचे संयोजक अतुल सतदेवे उपस्थित होते.
आयोजित संविधान गौरव प्रतियोगिता परीक्षेत प्रथम आशीष दमाहे (एमजी पैरामेडिकल कॉलेज), द्वितीय हिना लांजेवार (एस.एस. गर्ल्स कॉलेज), तृतीय नेहा ठाकुर (एमजी पैरामेडिकल कॉलेज) एकांकिका प्रस्तुती पलक किरणापुरे (राजमाता जिजाऊ), लक्ष्मी राऊत (फातिमा शेख), ईशिका धुर्वे (सवित्रीमाऊली), एकांकिका स्पर्धेत प्रथम अथांग भावे (अर्जुनी मोरगाव) , द्वितीय अर्णव मेश्राम , तृतीय प्रवज्जा कुर्वे, वेशभूषा स्पर्धेत प्रथम रुजुल वरखडे, द्वितीय अरहंत वालदे, तृतीय भार्गव धकाते, वक्तृत्व स्पर्धेत प्रथम लीना साठवणे, द्वितीय स्नेहा मेश्राम, तृतीय धीरज डोहणे, तर प्रोत्साहन पुरस्कार प्राप्त स्पर्धक पारूल कोटांगले, शीतल भुतेश्वर, मोहिनी साखरे, निकिता चामलाटे, अभय मच्छीरके, शुभांगी वासनिक, सिया इडपाचे, माधुरी भोयर, शालू लांजेवार, यशश्री कावळे, प्रतीक बंसोड़, आहना शहारे,भूमिका जगणे, हार्दिक ऊके, विराज राऊत, मैत्रेय कांबळे, लिशा राऊत, अक्षत वालदे, पारमिता कांबळे, रूपम मेश्राम, डेझी किरणापुरे, अरहंत भावे, प्रदुन्य बिजेवार यांना प्रमाणपत्र व बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. कोविड़ नियमांअंतर्गत सम्पन्न सदर कार्यक्रमाचे संचालन नेहा ठाकूर व आभार बिंदू कोडवते यांनी मानले.