गुरुवारी गडचिरोली 182,गोंदिया 117,भंडारा जिल्ह्यात 191 कोरोना बाधित

0
37

गोंदिया जिल्हा
आज पॉझिटिव्ह : 117
एकूण पॉझिटिव्ह : 44699
एकूण मृत्यू : 583
एकूण डिस्चार्ज: 42308
आज डिस्चार्ज : 228
सक्रिय रुग्ण : 1671

भंडारा, दि. 27 :  जिल्ह्यात गुरुवारी 191 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून आज (दि.27) बरे झालेल्या रुग्णांची संख्या 409 आहे. गुरुवारी 658 व्यक्तींची चाचणी केली असता 191 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता 2515 सक्रिय रुग्ण आहे. सक्रिय असलेल्या 2515 बाधित रुग्णापैंकी 2466 रुग्ण घरीच अलगीकरणात आहेत.आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 61012 आहे तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 64663 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.35 टक्केआहे. आतापर्यंत 05 लाख 22 हजार 444 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात 64663 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये भंडारा तालुक्यातील 92, मोहाडी 26, तुमसर 26, पवनी 13, लाखनी 18, साकोली 15 व लाखांदूर तालुक्यातील 01 व्यक्तींचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 1136 आहे. शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.

गडचिरोली जिल्हयात आज 220 कोरोनामुक्त, नवीन 182 कोरोनाबाधित

गडचिरोली,दि.27: आज गडचिरोली जिल्हयात 491 कोरोना तपासण्यांपैकी 182 नवीन कोरोना बाधित आढळले असून तब्बल 220 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 33889 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 31839 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 1297 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 753 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.95 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 3.83 टक्के तर मृत्यू दर 2.22 टक्के झाला आहे.

आज नवीन 182 बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 98,  आरमोरी तालुक्यातील 02, भामरागड तालुक्यातील 01, चामोर्शी तालुक्यातील 45, धानोरा तालुक्यातील 07, एटापल्ली तालुक्यातील 01, मुलचेरा तालुक्यातील 19, कोरची तालुक्यातील 01, कुरखेडा तालुक्यातील 07 आणि वडसा तालुक्यातील 01 जणाचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 220 रुग्णामध्ये गडचिरोली तालुक्यातील 87, अहेरी तालुक्यातील 03, आरमोरी तालुक्यातील 14, भामरागड तालुक्यातील 04, चामोर्शी तालुक्यातील 36, धानोरा तालुक्यातील 11, एटापल्ली तालुक्यातील 04, मुलचेरा तालुक्यातील 07, सिरोंचा तालुक्यातील 04, कोरची तालुक्यातील 01, कुरखेडा तालुक्यातील 25,आणि वडसा तालुक्यातील 24 जणाचा समावेश आहे.