
तिरोडा, ता.7::– तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राअंतर्गत सेजगाव खुर्द त.गोंदिया येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन तसेच लोकार्पण आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत जुनी ग्रामपंचायत ते सायटोला रस्ता खडीकरण (सेजगाव) – ७.५० लक्ष जल जीवन मिशन अंतर्गत नळ जोडणी (सेजगाव, कोहका, सायटोला) – अंदाजित रक्कम ८.१९ लक्ष,सर्व शिक्षण अभियान अंतर्गत जि प शाळा सेजगाव शाळा दुरुस्ती ५.०० लक्ष,जि.प.शाळा कोहका शौचालय बांधकाम ५.०० लक्ष जि प शाळा सायटोला नवीन वर्गखोली १०.०० लक्ष, जि प शाळा सायटोला शाळा दुरुस्ती ५.०० लक्ष १५ वित्त आयोग अंतर्गत सौर उर्जेवर आधारित लघु नळ योजना (सेजगाव)- ३.०० लक्ष, विंधन विहीर १.०० लक्ष,पाणी पुरवठा योजना विंधन विहीर (सेजगाव) – १.५० लक्ष,पाणी पुरवठा योजना विंधन विहीर १.११ लक्ष,सार्वजनिक सौचालय बांधकाम कोहका रक्कम १.११ लक्ष,विंधन विहीर प.स. स्तर २.०० लक्ष या कामांचे भूमिपूजन तसेच बंदिस्त नाली बांधकाम २.२५ लक्ष, सार्वजनिक सौचालय बांधकाम १.०० लक्ष, जि प शाळा सेजगाव सौचालाय बांधकाम १.०० लक्ष,बंदिस्त नाली बांधकाम ( कोहका ) २.०० लक्ष सिमेंट रस्ता बांधकाम (कोहका) ३.५० लक्ष बंदिस्त नाली बांधकाम(सायटोला) – रक्कम १.२५ लक्ष, प्रेमलाल राणे ते लेकचंद धुर्वे रस्ता खडीकरण (कोहका) – अंदाजित रक्कम १.०० लक्ष या कामांचे लोकार्पण करण्यात आले या कार्यक्रमाला प्रामुख्याने दवनीवाडा मंडळअध्यक्ष धनेंद्र अटरे,जि.प.सदस्या अंजली अटरे, माजी उपसभापती वसंत भगत, सरपंच अर्चना कंसरे, उपसरपंच प्रमोद पटले,ग्रा.प.सदस्य अनिता रहांगडाले, राकेश खरोले,संतोष पटले,सोनू चीखलोंडे,भाजप कार्यकर्ता प्रकाश पटले व गावकरी उपस्थित होते.