
गोंदिया,दि.07ः – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ०६ मार्चला जालन्यातील चर्चासत्रात राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना तिरुपती बालाजी येथील न्हाव्ह्यांची उपमा देऊन नाभिक समाजाचा अपमान केला.त्यांच्या या वक्तव्यामुळे नाभिक समाजाच्या भावना दुखावल्याने राज्यमंत्री दानवे यांचा निषेध करण्यासाठी १० मार्च गुरुवारला गोंदिया जिल्ह्यातील सर्व सलून व्यवसाय बंद ठेवून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत रावसाहेब दानवे यांच्यावर कारवाई करुन नाभिक समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निषेध निवेदन पाठविण्यात येणार आहे.
या सलून व्यवसाय बंद दरम्यान १० मार्चला गोंदिया येथील संत शिरोमणी सेनाजी महाराज तथा संतोषी माता मंदिरात दुपारी १२ : ०० वाजता गोंदिया जिल्ह्यातील नाभिक समाज एकत्र आल्यानंतर मुकमोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नेण्यात येईल. तत्पूर्वी जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याकडे गुन्हा नोंदवण्यात येईल.
तरी नाभिक समाजावरील वारंवार अन्यायाची बदनामी कायमस्वरुपी दूर सारण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील सर्व नाभिक समाज बांधवांनी नेहमी प्रमाणे नाभिक समाजाची एकता दाखवून आपापले सर्व सलून व्यवसाय बंद ठेवून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रांत उपाध्यक्ष अशोक चन्ने, विभागीय उपाध्यक्ष राजकुमार प्रतापगडे, जिल्हाध्यक्ष सोहन क्षीरसागर, सलून संघटनेचे जिल्हाध्यक्ष वासू भाकरे, जिल्हा युवाध्यक्ष विजय चन्ने, गोंदिया तालुकाध्यक्ष भुमेश मेश्राम, तिरोडा तालुकाध्यक्ष प्रिती अनकर, आमगाव तालुकाध्यक्ष शरद फुंडकर, सालेकसा तालुकाध्यक्ष दुलीचंद क्षीरसागर, देवरी तालुकाध्यक्ष किशोर कावळे, गोरेगाव तालुकाध्यक्ष उमाकांत चन्ने, सडक अर्जुनी तालुकाध्यक्ष योगेश सूर्यवंशी, मोरगांव अर्जुनी तालुकाध्यक्ष दादाजी कावळे आणि इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.