जाती दावा पडताळणी संदर्भात आवश्यक सूचना

0
43

 गोंदिया,दि.7 : सन 2021-22 या सत्रात शैक्षणिक (12 वी विज्ञान) ज्या
मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी आरक्षित (अनु.जाती, विजाभज, इमाव व विमाप्र)
प्रवर्गातून जाती दावा पडताळणीचे प्रकरण जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी
समिती,गोंदिया येथे सादर केले आहेत व अद्याप पर्यंत विद्यार्थ्यांना
वैधता प्रमाणपत्र मिळाले नाही तसेच ज्या अर्जदारांचे प्रकरणात त्रुटी
आढळून आलेल्या आहेत अशा विद्यार्थ्यांना त्यांचे प्रकरणातील त्रुटी
विद्यार्थी/अर्जदारांचे ई-मेलवर कळविण्यात आलेल्या आहेत. तथापी, अद्यापही
ज्या विद्यार्थ्यांनी त्यांचे जाती दावा पडताळणी प्रकरणात त्रुटी पुर्तता
केलेली नाही तसेच ज्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र ई-मेलद्वारे
प्राप्त झालेले नाही त्या विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी जाती
दावा पडताळणी प्रकरणातील त्रुटी संदर्भात आवश्यक पुरावे व कागदपत्रे
त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणी आयडीवर मुळ स्वरुपात अपलोड करुन समितीकडे
सादर करावे.

तसेच सन 2020-21 मध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेंतर्गत
(ग्रामपंचायत, नगरपंचायत व नगरपरिषद) निवडणुका पार पडल्या अशा विजयी
झालेल्या उमेदवारांचे मागासवर्गीयांचे आरक्षित प्रवर्गातून (अनु.जाती व
नामाप्र) प्रस्ताव समिती कार्यालयात ऑनलाईन व ऑफलाईन स्वरुपात सादर
करण्यात आले होते व ज्या उमेदवारांनी ऑफलाईनच्या माध्यमातून प्रकरणे सादर
केले होते अशा आरक्षित प्रवर्गातून (अनु.जाती व नामाप्र) निवडणूक
जिंकलेले उमेदवारांचे (त्रुटीचे प्रकरणे वगळून) जात वैधता प्रमाणपत्र
तयार झाले असून त्यांनी तात्काळ कार्यालयातून प्राप्त करुन घ्यावे.

दिनांक 4 मार्च 2022 पासून बारावी विज्ञान शाखेतील
विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ
पुणे अंतर्गत परीक्षेला सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांनी त्यांचे
प्रकरणातील त्रुटी पुर्ततेकरीता स्वत: कार्यालयात उपस्थित न होता ते
आपल्या पालकांमार्फत (आई,वडील,भाऊ व बहीण) आवश्यक मूळ पुरावे व कागदपत्रे
सादर करु शकतात. असे उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी
समिती,गोंदिया यांनी कळविले आहे.