
अर्जुनी मोर.दि.07ः- एकलव्य व द्रोणाचार्य या गुरुशिष्याचे नाते इतिहासात अजरामर आहेत. गुरुशिवाय मार्ग नाही,आपल्या देशात गुरुपुजेला विशेष महत्त्व आहे. गुरुशिष्यांचे नाते फार अतूट आहे.तेव्हा प्रत्येकांनी गुरुंचा आदर्श बाळगावा, माझे कुटुंब समाजसेवेसाठी कार्यतत्पर आहे. आपल्या पतीपासुन समाजसेवेची प्रेरणा घेवुन मी इटखेडा जिल्हा परिषदेची निवडणूक लढविली.आणि या क्षेत्रातील जनतेनी मला भरघोस मतांनी निवडून दिले. त्यामुळे मतदारच माझे गुरु असुन मी माझ्या मतदार गुरुंच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे भावनात्मक उदगार इटखेडा क्षेत्राच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या पोर्णिमा उमाकांत ढेंगे यांनी काढले.
इटखेडा जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत झरपडा येथे ५ मार्च रोजी एकलव्य भोई समाज संघटनेच्या वतीने आयोजित एकलव्य जयंती व नवनिर्वाचित पदाधिकारी सत्कार समारंभाप्रसंगी जि.प.सदस्या पोर्णिमा ढेंगे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जि.पी.परशुरामकर होते.मुर्तीपुजक म्हणुन नवनिर्वाचित पं स सदस्य नुतनलाल सोनवाने, विशेष अतिथी म्हणुन जि.प.सदस्या पोर्णिमा ढेंगे, सरपंच कुंदाताई डोंगरवार, उपसरपंच विश्वनाथ खोब्रागडे, होमराज ठाकरे, मुन्ना बोरकर, नामदेव परशुरामकर, आनंदराव सोनवाने, पुण्यशिल टेंभुर्णे, पोलीस पाटील संतोष डोंगरवार, नितीन नाकाडे, यशवंत मेश्राम, माजी सरपंच तनुरेषा रामटेके, डोमाजी शहारे, व भोईसमाज संघटनेचे कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्वप्रथम अतिथीच्या हस्ते धनुर्धारी एकलव्य यांचे पुर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली आहे.यावेळी झरपडा येथील एकलव्य भोईसमाज संघटनेच्या वतीने नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य पोर्णिमा उमाकांत ढेंगे, तथा नवनिर्वाचित पं स सदस्य नुतनलाल सोनवाने व अन्य मान्यवरांचे शाल श्रीफळ व पुष्प गुच्छ देवुन सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष परशुरामकर व पंचायत समिती सदस्य नुतनलाल सोनवाने यांनीही एकलव्याच्या जिवनकार्यावर प्रकाश टाकला. प्रास्ताविक गुणेश्वर चाचेरे,तर संचालन व आभार हेमंत मेश्राम यांनी केले.यशस्वीतेसाठी डोमाजी शहारे, नामदेव कांबळे, मंगेश मखरे, आनंदराव सोनवाने, भोजराज सोनवाने, राकेश मखरे,व भोईसमाज संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.