
संथागार मॅरेज ब्युरो चे मुख्य नियंत्रक संतोष श्यामकुवर एम.पी. भेलावे यांच्या प्रयत्नांना यश
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील बौद्ध युवक-युवतीनी लावली हजेरी
गोंदिया,दि.07- बुद्धिष्ट समाज संघ संथागार गोंदिया द्वारा-बुध्दिष्ट मॅरेज ब्युरो गोंदिया तर्फे बुद्धिष्ट युवक-युवती परिचय संमेलन बुद्धीष्ट समाज संघ संथागार गोंदिया येथे नुकतेच संपन्न झाले. यापरिचय संमेलनात साडेतीनशेच्या वर बुद्धिष्ट युवक-युवतींनी आपली नोंदणी केली होती. यापैकी दहा नोंदणी झालेल्या युवक-युवतींचे लग्न जोडण्याच्या मार्गावर आहेत. संथागार मॅरेज ब्युरोचे मुख्य नियंत्रक संतोष श्यामकुवर व एम.पी.भेलावे यांच्या मार्गदर्शनात आयोजित या संमेलनात कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून स्थानिक गुन्हे शाखा गोंदियाचे पीएसआय तेजेंद्र मेश्राम, कार्यक्रमाचे उद्घाटक सिद्धार्थ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ठाणेगाव येथील शिक्षिका अर्चना बन्सोड, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून गोंदिया जिल्ह्याचे जिल्हा दुय्यम उपनिबंधक शुद्धोधन कांबळे,संथागारचे मुख्य नियंत्रक डी.डी.मेश्राम बी.एस.एस.संथागारचे प्रभाकर गजभिये,बीओडी देवचंद वैद्य, मॅरेज ब्युरोचे मुख्य नियंत्रक संतोष श्यामकुवर ,एम.पी भेलावे, सुशील गणवीर,अरुण भालाधरे,निरजंना चिचखेडे,संजय वाहने, विनोदकुमार माने आदीसह संथागार बुद्धिस्ट मॅरेज ब्युरोचे सर्व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष,उद्घाटक, प्रमुख अतिथी यांच्या हस्ते महाकारूणीक तथागत गौतम बुद्ध तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रासमोर दीपप्रज्वलन व माल्यार्पण करुन त्यांना वंदन करण्यात आले.बुद्धवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.तद्वतच संथागार मॅरेज ब्युरो फलकाचे रीतसर फित कापून अर्चना बन्सोड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी सुशील गणवीर,अरुण भालाधरे यांच्या हस्ते बॅचेस लावून तसेच पुष्पगुच्छाने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.आपल्या उद्घाटनिय भाषणातून अर्चना बनसोड यांनी असे परिचय संमेलने काळाची गरज असून यातून वेळ आणि पैशाची बचत होते असे सांगितले तर तर कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शुद्धोधन कांबळे यांनी उपजाती विसरून एकत्र येऊन परिचय संमेलनाच्या माध्यमातून आपल्या मुलामुलींचे लग्न जुळविणे आवश्यक आहे. या माध्यमातून पैशाचा अपव्यय टाळला जाईल ते बोलले. याप्रसंगी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष पीएसआय तेजेंद्र मेश्राम म्हणाले की, अशा परिचय संमेलनातून मुला मुलींच्या लग्नासाठी आई-वडिलांची होणारी पायपीट थांबेल.संथागार याठिकाणी राबवलेला हा स्तुत्यपूर्ण उपक्रम आहे. याबरोबरच ते म्हणाले की समाजातील गरीब, गरजू ,हुशार गरजु विद्यार्थ्यांना आयआयटी, नीट व स्पर्धा परीक्षेची तयारीसाठी दरवर्षी 20 विद्यार्थ्यांना पुणे, दिल्ली, पाठविण्यासाठी ‘मिशन उत्थान’ येत्या 14 एप्रिल पासून राबविण्याची संकल्पना त्यांनी मांडली यासाठी समाजातील नौकरदार व व्यावसायिक वर्गाने यात सहभागी होण्याचे आव्हान त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमादरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे पीएचडी मानद पदवी प्राप्त केलेले प्रा.डॉ.किशोर वासनिक, प्रा.डॉ.विनोद गेडाम, प्रा.निता खांडेकर यांचा यावेळी पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रस्ताविक संथागार मॅरेज ब्युरोचे नियंत्रक संतोष शामकुवर सूत्रसंचालन एम.पी.भेलावे,हर्षिला वैद्य, वैशालीताई खोब्रागडे, समता गणवीर,गौतम गजभिये यांनी तर आभार विनोदकुमार माने,शुशिल गणवीर यांनी मानले. सदर कार्यक्रमादरम्यान वंदना संतोष श्यामकुवर यांच्या मार्गदर्शनात मैत्रेय म्युझिकल ग्रुपच्या सर्व टीमच्या वतीने भिम-बुद्ध गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कल्पना पटले,अल्का बन्सोड,वंदना वाहने,दीपेन वासनिक, भीमराव बन्सोड, अज्ञान हुमने, मनिषा गजभिये, कोमल नंदागवली, सुनिता भालाधरे, छाया बोरकर सह मॅरेज ब्युरोच्या समस्त पदाधिकाऱ्यांनी तसेच संथागार परिवारातील सर्व पदाधिकारी व सदस्यांनी अथक प्रयत्न घेतले.