Home विदर्भ सरपंचांनी केला राज्य शासनाचा निषेध

सरपंचांनी केला राज्य शासनाचा निषेध

0

देवरी  दि. ४ –: राज्य शासनाकडून सरपंचांना अन्य भत्ते न देता नाममात्र मानधन दिले जात असल्याने सरपंचांनी राज्य शासनाच्या या कृतीचा निषेध व्यक्त केला. या संदर्भात त्यांनी खंडविकास अधिकार्‍यांमार्फत शासनाला निवेदन पाठविले. याप्रसंगी सरपंच संघटनेचे अध्यक्ष कमल येरणे, सचिव डॉ. जे.टी. रहांगडाले, उपाध्यक्ष हिरामणसलामे, भोजराज घासले, गीता सयाम, सुषमा येल्ले, सुग्रता भोयर, नरसिंग फडकी, राजकुमार भय्या, सर्वानंद कवास, योगीता कोरे, मंदा चंदेल, प्रमीला घासले, वेणू भोयर, तिरू वाघाडे, प्रभा खोब्रागडे, प्रमिला चाकाटे व अन्य सरपंच उपस्थित होते.

Exit mobile version