क्षत्रिय पोवार समाज संघटनेचे जिल्हाधिकारी गोंदिया यांना निवेदन
गोरेगाव:- जिल्ह्यातील क्षत्रिय पोवार समाज संघटनांच्या वतीने 14 मार्चला बिरसी विमानतळाला चक्रवर्ती सम्राट राजाभोज किंवा राजा विक्रमादित्य यांचे नाव देण्याबाबत जिल्हाधिकारी गोंदिया यांना क्षत्रिय पोवार समाज संघटनाच्या वतीने निवेदन देण्यात आले गोंदिया जिल्ह्यात सर्वात जास्त प्रमाणात पोवार समाज बंधू भगिनी आहेत. जिल्हावासीयांना प्रवासी विमानसेवा वाहतुकीकरिता विमानतळ तयार करण्यात आले .
या विमानतळावरून प्रवासी विमानसेवा वाहतूक सुविधा केंद्र सरकार अंतर्गत गोंदिया ते हैदराबाद,गोंदिया ते इंदौर प्रवासी वाहतूक दिनांक 13 मार्च पासून सुरू झालेली आहे गोंदिया जिल्ह्यात शासकीय व निमशासकीय इमारत तसेच अनेक विकास कामे झालेली आहेत पण आजपर्यत एकही विकासकामाला पोवार समाजाचे प्रेरणास्त्रोत चक्रवर्ती सम्राट राजाभोज किंवा राजा विक्रमादित्य यांचे नाव देण्यात आलेले नाही.
8 मार्चला तहसिलदार तहसिल कार्यालय गोरेगांव यांना पोवार समाज संघटना तालुका गोरेगांवच्या वतीने मुख्यमंत्री यांच्या नावे निवेदन देण्यात आले होते.विमानतळ तयार करण्यासाठी सर्वाधिक पोवार समाजाची जमीन देण्यात आली आहे. जिल्ह्यातील पोवार समाज बांधव यांनी 14 मार्चला जिल्हाधिकारी नयना गुंडे यांच्यामार्फत केंद्रीय नागरिक उड्डयन मंत्री भारत सरकार ज्योतिरादित्य सिंधिया यांना निवेदन दिले. निवेदनात बिरसी विमानतळाला पोवार समाजाचे प्रेरणास्त्रोत चक्रवर्ती सम्राट राजाभोज किंवा राजा विक्रमादित्य यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली आहे.
निवेदन देतेवेळी रेखलाल टेंभरे,जिल्हा परिषद सदस्य संजय टेंभरे, आनंद पटले, उमेंद्र कटरे,उमेंद्र ठाकुर मुंडीपार , राजेंद्र बिसेन,विजय कटरे, विनोद ठाकुर ,विष्णू चौधरी, दिलीप चव्हाण, विकी चौधरी, वेंकट बिसेन, कुमार बघेले, देवेंद्र कटरे, योगेश रांहागडाले आदी पोवार समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.