सडक अर्जुनी:-(महेंद्र टेंभरे):–तालुक्यातील कोसमतोंडी येथे आज 15 मार्च 2022 ला सकाळी 7.20 वाजे दरम्यान गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोसमतोंडी च्या आवारात एक हरणाचे पिल्लू गावरान कुत्र्यांच्या भितीने दडून बसली होते.सदर हरणाचे पिल्लाला गावातील सुभाष काशिवार रोहयो तांत्रिक सहाय्यक , अनिल काशिवार, शुभम लांजेवार, विजय बावनकर,विजय गोंडाने ,लक्ष्मण कापगते यांनी मिळून सुखरुप बाहेर काढून जीवदान देऊन वन्यजीव विभाग क्षेत्रसहायक कार्यालय कोसमतोंडी यांच्या कडे सुपूर्द केले..