अंगणवाडी बांधकामासाठीही बांधकाम विभागाटी आ़डकाटी

0
31

गोंदिया,दि.15-गोंदिया जिल्हा परिषदेवर सध्या गेल्या दोनवर्षापासून प्रशासक राज सुरु असून या प्रशासक राजमध्ये मात्र विकास कामांच्या नावावर वसुलीधंदाच सुरु झाला की काय अशी अवस्था निर्माण झालेली आहे.बांधकाम विभागातील विविध कामांचे प्रशासकिय मान्यतेचे पत्र हे आमदारांच्या कार्यालयात पोचते केले जातात तर काही पत्र आपल्या वाटणीच्या हिस्स्यासाठी अधिकारी कार्यालयात ठेवून कंत्राटदाराना वाटप करीत असल्याचा प्रकाराने जिल्हा परिषद चांगलीच गाजत आहे.या काळातच आत्ता जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाच्यावतीने जिल्ह्यात नवीन 88 व अंगणवाडी दुरुस्तीचे सुमारे 100 कामे मंजुर करण्यात आली आहेत.ही सर्व कामे शासन नियमाप्रमाणे ग्रामंपचायतीच्या माध्यमातून केली जाणार आहेत.मात्र यापैकी बहुतांश कामाचे प्रशासकीय मान्यता असलेले मुळ पत्र हे आमदारांना व काही निवडक कंत्राटदारांना वाटप करण्यात आले आहे.ते मुळ पत्र हाती असलेले लोकप्रतिनिधींनी आपल्या कार्यकर्त्यांची आर्थिक बाजू समृध्द करण्यासाठी जवळ ठेवले असले तरी एंजसी मात्र ग्रामपंचायतच राहणार असा सुर ठेवला असला तरी अनेक ग्रामंपचायती स्वतःया काम करायला तयार असताना त्यांना मात्र हे पत्र देण्यास बांधकाम विभागाचे अधिकारी टाळाटाळ करीत असल्याचे चित्र समोर आले आहे.काही सरपंच,उपसरपंचानी मुकाअसह महिलाबालविकास विभाग व बांधकाम विभागाचे अधिकारी यांना भेटून अंगणवाडी बांधकामाची मंजुरी देण्याची विनवणी केली मात्र सगळेच एकमेकांकडे बोट दाखवित असल्याचा सूर समोर आला आहे.गेल्या 1 महिन्यापासून सालेकसा तालुक्यातील पोवारीटोला,आमगाव तालुक्यातील कट्टीपारसह अनेक अशा ठिकाणच्या अंगणवाडींची दुरावस्था झाली असून त्या कोसळून कधीही हाणी होण्याची शक्यता असल्याने त्यांचे बांधकाम ग्रामपंचायतीला त्वरीत सुरु करण्यासाठी मुळ प्रमा देण्याची विनंती करुनही त्यांना टाळाटाळ करण्यामागचे कारण काय अशा प्रश्न उपस्थित झालेला आहे.