जलशक्ती अभियान कार्यक्रम उत्साहात
अर्जुनी /मोर ता.30:-तालुक्यातील पवनी /धाबे इथल्या ग्रामपंचायत कार्यालयात जलशक्ती अभियान कार्यक्रम (ता.29) उत्साहात साजरा करण्यात आला.गावकऱ्यांनी जलशपथ घेऊन पाणी वाचविण्याचा निर्धार केला.दरम्यान यावेळी उपस्थित सरपंच श्रीमती पपीता नंदेश्वर यांनी मार्गदर्शन करताना ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी मनरेगा अंतर्गत जल संधरनाची कामे करावी असे त्या म्हणाल्या.
उपसरपंच पराग कापगते यांनी,शेतकऱ्यांनी जल पुनर्भरनाची कामे करताना आपल्या शेतातील विहिरीजवळ 6x6x6 चा खड्डा करून शेतीबाहेर जाणारे अतिरिक्त पाणी या खड्ड्यात मुरवावे आणि जल पुनर्भरण करावे अशी विनंती शेतकऱ्यांना केली.तर पिण्याचे शुद्ध पाणी पुरवठा यावर विचार व्यक्त करतांना ग्रामसेवक पृथ्वीराज कोल्हटकर यांनी शुद्ध पाण्याचे महत्व पटवून दिले.त्यांनी टीसीएल पावडर चा उपयोग आणि ओटी टेस्ट ची माहिती गावकऱ्यांना समजावून दिली.हा कार्यक्रम दिनांक 29 मार्च पासून ते 30 सप्टेंबर 2022 पर्यन्त राबविण्यात यावा असे शासनाचे निर्देश आहेत.
क्रांतीज्योती सावित्रीआई फुल्यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी जलकुंभात पाणी ठेवून जलपूजा करण्यात आली.
गावकऱ्याकडून जलशपथ वदवून घेण्यात आली.दरम्यान या कार्यक्रमामुळे,भविष्यात पिण्याच्या पाण्याची भेडसावणारी समस्या आणि त्याचे दुषपरिणाम यावर माहिती गावकर्यांना कळाली.या कार्यक्रमात, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावकरी उपस्थित होते.संचालन करून ग्रामसेवक पृथ्वीराज कोल्हटकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.