देवरी03 -हिंदूनव वर्षाची सुरवात म्हणजेच गुडीपाडवा. या सणानिमित्त देवरीच्या धुकेश्वरी महिला ढोलताशा मंडळाच्या वतीने शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
गेल्या दोन वर्ष कोरोनाचे सावटाखाली गेल्याने गुडीपाडव्यानिमित्त काढण्यात येणारी रॅली रद्द करण्याची वेळ आली होती. परंतू , कोरोनासंबंधी सर्व निर्बंध सरकारने हटविल्याने यावर्षी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या रॅलीत भगवा फेटा परिधान केलेल्या शेकडो महिला पुरुषांनी आपला सहभाग नोंदविला. शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करीत श्रीराम मंदीरात दर्शन घेवून या रॅलीचे समापन धुकेश्वरी मंदिरात करण्यात आले. यानंतर ज्योत प्रज्वल्लित करण्यात आल्या.
या रॅलीला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. यावेळी देवरी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.