
गोंदिया,दि.04 : देशात वाढलेल्या महागाईच्या निषेधार्थ गोंदिया जिल्हा कॉंग्रेस समितीतर्फे आज डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौका आंदोलन करण्यात आले.केंद्र सरकारच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली.यावेळी चुलीवर स्वंयपांक करुन गँसदरवाढीचा व बैलबंडीवरुन जाऊन इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करत मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.आंदोलनानंतर राष्ट्रपती व प्रधानमंत्री यांच्या नावे असलेले निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फेत देण्यात आले. काँग्रेस पदाधिकारी व नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी करून केंद्र सरकारचा निषेध केला.राज्यात पेट्रोल,डिझेल, गॅसचे दर हे गगनाला भिडले आहे. सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहेत. या भाववाढीच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेसतर्फे प्रशासकीय इमारतीसमोरील चौकात वाढत्या महागाई विरोधात अनोखे आंदोलन केले. याप्रसंगी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार व जिल्हा काँग्रेस कमिटी द्वारा “महागाई मुक्त भारत” व प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना गावांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन करण्यात आले.
यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप बन्सोड,प्रदेश महासचिव नामदेवराव किरसान,अशोक गुप्ता,किसान सेल अध्यक्ष जितेश राणे,जिल्हा महिला अध्यक्ष वंदना काळे,सोशल मीडिया अध्यक्ष योगेश अग्रवाल,जिल्हा परिषद गट नेते संदीप भाटीया,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे,उषा शहारे,ओबीसी महिला आघाडी प्रदेश सदस्य व जि.प.सदस्य विमल कटरे,राजु पालीवाल,पप्पू पटले,राजू काळे,गौरव बिसेन,देवचंद बिसेन,अनिल गौतम,पुष्पा खोटेले,परवेज बेग व सर्व सेलचे पदाधिकारी,कार्यकर्ते सहभागी झाले होते.