समाजाला विकासाची गती देण्यात महीलांचे मोठे योगदान- जि.प.सदस्य पकंज रहांगडाले

0
41

गोरेगाव,दि.08ः- तालुक्यातील सोनी येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अतंर्गत एकता प्रभाग संघ,सोनीच्या वतीने “महीला मेळावा व वार्षीक सभेचे” उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य पंकजभाऊ रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थानी सिताबाई रहांगडाले होत्या. तर पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य किशोर पारधी, शशीबाई पुन्डे,पोलीस पाटील आशाबाई बोपचे,ललिताबाई पुन्डे,उमेद तालुका अभियान व्यवस्थापक जितेंद्र बिसेन, राहुल बोपचे,आरती बावनकर प्रभाग समन्वयक,लक्ष्मीप्रसाद बारापात्रे,सरिताबाई पुन्डे,ममताबाई पटले,ममताबाई टेभंरे ,पियुष बघेले ग्रा.प.सदस्य उपस्थित होते.यावेळी बोलतांना जि.प.सदस्य पंकज रहागंडाले यांनी महीलांच्या विकासाची व शौर्याच्या गौरवगाथा सागंत राष्ट्राच्या विकास घडविण्यात महीलांचा सिंहाचा वाटा असुन महीलाशक्ती ही राष्ट्र शक्ती आहे.समाजाला विकासाची गती देण्यात महीलांचे मोठे योगदान असल्याचे विचार व्यक्त केले.या कार्यक्रमात एकता प्रभाग संघ,सोनीच्या महीलांनी सेंद्रीयशेती करुन विविध भाजीपाल्याचे स्टाँल लावण्यात आले होते. सोनी,नोनीटोला,बोटे,दवडीपार,झांजिया ,मोहगावं येथील सर्व बचत गटातील महीला उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन सौ.भुमेश्वरीबाई पुन्डे यांनी केले तर आभार कटरे यांनी मानले.