
चंद्रपूर दि 19-वनहक्क कायदा अधिनियम २००६ च्या कायद्यान्वये जिवती तालुक्यातील काकबन येथील आदिवासी बांधवांना सोमवारी तहसिलदार चिडे यांचे हस्ते वनहक्क धारकांना मालकी हक्काचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
यावेळी भुजंगराव कोटणाके, मारोती सिडाम, श्रमिक एल्गार चे उपाध्यक्ष घनशाम मेश्राम, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे विदर्भ सचिव महिपाल मडावी उपस्थित होते. आदिवासींना वनहक्क दाव्यात त्रुटयांची पूर्तता करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने एक धोरण राबवून राजुरा उपविभागातील कोलाम आदिवासी बांधवांना मालकी हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी यावेळी श्रमिक एल्गार चे घनश्याम मेश्राम यांनी केली आहे.