Home विदर्भ उद्या शुक्रवारला व्यसनमुक्ती दिंडी

उद्या शुक्रवारला व्यसनमुक्ती दिंडी

0

गोंदिया,दि. २१ : गोंदिया येथे २२ व २३ जानेवारी दरम्यान आयोजित देशातील चौथ्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचे औचित्य साधून आज २२ जानेवारी रोजी व्यसनमुक्ती दिंडी शहरात आयोजन करण्यात आले आहे. या दिंडीमध्ये शहरातील व जिल्हयातील विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी व नागरिक मोठया संख्येने सहभागी होणार आहेत. व्यसनमुक्ती दिंडीमुळे शहरात व जिल्हयात व्यसनमुक्तीचा संदेश सर्वसामान्यापर्यंत जाण्यास निश्चितच मदत होणार आहे. सकाळी ९ वाजता इंदिरा गांधी स्टेडियम येथून या दिंडीची सुरुवात होईल. स्टेडियम येथे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री राजकुमार बडोले हे उपस्थित विद्यार्थ्याना व्यसनमुक्तीची शपथ देतील. यावेळी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जि.प.चे मुख्ये कार्यकारी अधिकारी विजय गावडे, पोलीस अधीक्षक शशीकुमार मीना, नगराध्यक्ष कशिश जायसवाल, जि.प.उपाध्यक्षा रचना गहाणे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. ही दिंडी नेहरु चौक-गोरेलाल चौक- गांधीप्रतिमा येथून स्वागत लॉन या साहित्य संमेलनस्थळी पोहोचेल. तरी व्यसनमुक्ती दिंडीमध्ये युवावर्गाने मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Exit mobile version