Home विदर्भ ना. गडकरीच्या हस्ते शनिवारला नवीन राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे भूमिपूजन

ना. गडकरीच्या हस्ते शनिवारला नवीन राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे भूमिपूजन

0

राष्ट्रीय महामार्ग भूूमिपूजन व व्यसनमुक्ती पुरस्कार सोहळ्याला राहणार उपस्थित
गोंदिया : देशाचे जहाज बांधणी व भूपृष्ठ वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी आज २३ जानेवारी रोजी गोंदिया जिल्ह्याच्या दौèयावर येत आहेत. दौèयादरम्यान, ना. गडकरी हे हेलीकॉप्टरने दुपारी १ वाजता अर्जुनी मोरगाव येथे आगमन व शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालयाच्या कार्यक्रमात उपस्थित राहतील. दुपारी ३ वाजता गोंदिया येथे नवीन कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ मोक्षधाम मार्गावर नवीन राष्ट्रीय महामार्ग शिवणी-बालाघाट-गोंदिया व गोंदिया बायपास मार्गाच्या बांधकामाचा शिलाकोन ठेवून भूमिपूजन करतील. तद्नंतर ३.३० वाजता भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्या गणेशनगर येथील निवासस्थानी भेट देतील. त्यानंतर ४ वाजता गणेशनगर येथील स्वागत लॉन येथे आयोजित देशातील चौथ्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलन व राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहतील. कार्यक्रमानंतर बिरसी विमानतळावरून दिल्लीकडे प्रयाण करतील. सदर कार्यक्रमाला अधिकाधिक संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय जनता पक्षातर्फे पालकमंत्री राजकुमार बडोले, खा. नाना पटोले, जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, आ. विजय रहांगडाले, आ. संजय पुराम, माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, माजी आ. दयाराम कापगते, केशव मानकर, खुशाल बोपचे, भजनदास वैद्य, खोमेश रहांगडाले, भेरqसग नागपुरे, हरीश मोरे, जि. प. उपाध्यक्ष रचना गहाणे, नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, सभापती छायाताई दसरे, सभापती देवराम वडगाये, प्रदेश महिला मोर्चा सचिव सिताबाई रहांगडाले, राकेश शर्मा, अशोक इंगळे, संतोष चव्हाण, विरेंद्र अंजनकर, दीपक कदम, भाजयुमो जिल्हाध्यक्ष संजय कुळकर्णी, मंडळ अध्यक्ष भरत क्षत्रीय, उमाकांत ढेंगे, छत्रपाल तुरकर, परसराम फुंडे, अ‍ॅड. येसुलाल उपराडे, प्रमोद संगीडवार, डॉ. लक्ष्मण भगत, भाउराव कठाणे, सलाम शेख, विजय बिसेन आदींनी केले आहे.

 

Exit mobile version