आमगाव,दि.26:-डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय कुंभारटोली च्या वतीने तथागत सम्यक संबुद्ध यांच्या जयंतीनिमित्त बौद्ध पौर्णिमेनिमित्त कुंभारटोली येथे भव्य निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.येथील शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांचा विकास व्हावा या उदात्त हेतूने सदर स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धा दोन गटात विभागून घेण्यात आली. प्रथम गट इयत्ता पहिली ते आठवी आणि दुसरा गट इयता 9 ते पदवी असे ठेवण्यात आले. पहिल्या गटासाठी स्पर्धेचे शीर्षक *पर्यावरण संरक्षण काळाची गरज आणि गट क्रमांक दोनसाठी शीर्षक भारतीय संविधान व मानवाचा विकास.. असा होता. गट क्र.1 साठी प्रथम बक्षीस महेंद्र मेश्राम तर द्वितीय बक्षीस सुरेश डोंगरे तसेच गट क्र.साठी प्रथम बक्षीस मनोहर डोंगरे व द्वितीय बक्षीस प्रियंका डोंगरे यांच्यातर्फे प्रदान करण्यात देण्यात आला.तसेच स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांना मा. आशिष वैद्य यांच्या कडून 1 वही 1 पेन बक्षीस देण्यात आला.परीक्षक म्हणून मा.सावन कटरे यांनी काम पाहिले.
गट क्रमांक एक मधील विजेत्या प्रथम क्रमांकाचे बक्षीस प्रिंशी कृष्णदास नंदेश्वर आणि द्वितीय पारितोषिक विजेत्या अन्वयी दिनेश डोंगरे होत्या. तसेच गट क्रमंक 2 च्य प्रथम पारितोषिक विजेते सोनाक्षी सत्यवान मडामे आणि द्वितीय पारितोषिक विजेत्या पल्लवी कुंभराज हटवार ठरल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनोहर डोंगरे तसेच प्रमुख पाहुणे तसेच बक्षीस वितरक म्हणून आनंद मेश्राम, सुरेश डोंगरे,आशाबाई राहुलकर,हेमलता डोंगरे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्निल खुशालचंद मेश्राम यांनी केले तर आभार नलिनीताई श्यामकुंवर यांनी मानले.यशस्वी आयोजनासाठी मुकेश डोंगरे,नलिनी श्यामकुवर, विलास साखरे,कला बागडे,प्रमिला कांबळे आणि समस्त गावकरी समाजबांधव यांनी सहकार्य केले..