अर्जुनी मोरगाव,दि.26 :- अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव जिल्हा परिषद गण क्षेत्रातील नवनिर्वाचित निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्य जयश्री अनिल देशमुख,पंचायत समिती क्षेत्राचे महागाव गणाचे सदस्य प्रमोदकुमार लहानु लांडगे यांचा ग्रामपंचायत महागावच्या वतीने सरपंच प्रभाकर अंताराम कोवे यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित उपसरपंच चंद्रभान वासुदेवजी पुस्तोडे,ग्रामपंचायत सदस्य छगन साखरे,ग्रामपंचायत सदस्य मंदाताई पात्रीकर,निर्मला नाकाडे,सुंदरा कोल्हाटकर,गायत्री उईके,रसिका रामटेके तसेच ग्रामपंचायत महागावचे ग्राम विकास अधिकारी तसेच ग्रामपंचायत सर्व कर्मचारी उपस्थित होते.