बुलडाणा… डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत असलेल्या कृषि विज्ञान केंद्र, बुलढाणा येथे जिल्ह्यातील शेतकरी तसेच आंबा प्रेमींसाठी भव्य आंबा महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी
डॉ. एस. रामामुर्ती, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाचे , फळशास्त्र विभागचे प्रमुख डॉ. एस .जी. भराड, डॉ. एस. आर. पाटील (शास्त्रज्ञ ,फळशास्त्र विभाग) , डॉ. उज्वल राऊत( शास्त्रज्ञ, उद्यानविद्या विभाग), एन. एस. नाईक,( जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी), डॉ. सी. पी. जायभाये, डॉ. सतीश जाधव, तसेच सीताफळ महासंघाचे सचिव श्अनिल बोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
बुलढाणा जिल्ह्यात आंबा लागवडीस शेतकऱ्यांचा वाढता कल लक्षात घेता शास्त्रीय पद्धतीने लागवड व्हावी तसेच जिल्ह्यातील विविध आंबा जातींची माहिती शेतकऱ्यांना व्हावी आणि शास्त्रज्ञांना लागवड तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचवता येण्यासाठी या आंबा महोत्सवाचे आयोजन कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने केले आहे. दरवर्षी अश्या महोत्सवाचे आयोजन होणार आहे.