केंद्रीय मंत्री नितीन गडकरी २९ ला जिल्ह्यात 

0
45
गोंदिया : केंद्रीय रस्ते परिवहन व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी हे २९ मे रोजी गोंदिया जिल्ह्यात येत असून त्यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाचे  भुमिपूजन संपन्न होणार आहे. २९ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा क्रिडा संकुल येथे आयोजित कार्यक्रमात भुमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यात तिरोडा-गोंदिया राष्ट्रीय महामार्ग ७५६ चे २८ कि.मी. चे २३९.२४ कोटीचे व आमगाव-गोंदिया ५४३ महामार्गाचे २० कि.मी.चे २८८.१३ कोटीच्या कामाचा समावेश आहे.
कार्यक्रमात प्रामुख्याने खा. सुनील मेंढे, खा. अशोक नेते, आ. डॉ. परिणय फुके, आ. विजय रहांगडाले, जि प अध्यक्ष पंकज रहांगडाले आदि मान्यवर उपस्थित राहणार असून कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष केशवभाऊ मानकर यांनी केले आहे.