
भंडारा,दि.29ः- ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या मागासवर्गीयांच्या समर्पित आयोगाने नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात विदर्भातील ओबीसी संघटना व संघटनापदाधिकारीसोबत भेट घेत चर्चा केली.या आयोगासमोर ओबीसी सेवा संघ भंडारा, ओबीसी महिला संघ भंडारा, ओबीसी जनगणना परिषद भंडाराच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून आपले म्हणने मांडून निवेदन सादर केले.यावेळी सदानंद ईलमे मुख्य समन्वयक, गोपाल सेलोकर अध्यक्ष, मंगलाताई वाडिभस्मे महाराष्ट्र अध्यक्षा, ईश्वर निकुळे कार्याध्यक्ष भंडारा, डॉ बाळकृष्ण सार्वे,श्रीकृष्ण पडोळे, रमेश शहारे, गोपाल देशमुख,मुरलीधर भर्रे, वामन गोंधुळे,सुधाकर मोथलकर, शालिक कुकडे, बाळासाहेब गावंडे, भवसागर साहेब,ओबीसी अधिकारी मंच गोंदियाचे खेमेंद्र कटरे, प्रमिला डोरले, वृंदा गायधनी उपस्थित होते. आयोगासमोर साक्ष देतांना ओबीसी आरक्षण कसे आवश्यक आहे हे पटवून देण्यात आले.राजकिय आरक्षणासह शैक्षणिक व नोकरितील आरक्षण,शिष्यवृत्ती,होस्टेल,जातिनिहाय जनगणना इत्यादी बाबतीत चर्चा करण्यात आली.
संघर्ष वाहिनी,भटक्या विमुक्त जातीसंघटनेच्यावतीनेही निवेदन सादर करण्यात आले.यावेळी मुकुंद अडेवार,किशोर सायगन,अनिल राऊत,अर्चना कोट्टेवार,अश्विनि नागुलवार,राजेंद्र बढिये,धर्मपाल शेंडे,राजु चव्हाण,किशोर वर्हाडे,अण्णाजी राऊत ,गजेंद्र साखरे व हिरामण साखरे आदी उपस्थित होते.संघर्ष वाहिनी आयोगाला भेटण्यापुर्वी आयोगाच्या या कृतीच्याविरोधात आंदोलन करुन निदर्शने करीत आयोगाची कृती चुकीची असल्याचे म्हटले आहे.सोबतच मागासवर्गीयांची जनगणना करण्यात यावे तोशिवाय हे आरक्षण कायम टिकणार नसल्याचेही म्हटले आहे.