गोंदिया- महाराष्ट्रातील पहिली आदिवासी कवयित्री अशी नाममुद्रा लाभलेल्या उषाकिरण आत्राम यांच्या ‘मोट्यारिन’ या गोंडी भाषेतील पहिल्या कविता संग्रहाचा अनुवाद आता इंग्रजी भाषेत उपलब्ध झाला आहे. अमरकंटक विद्यापीठाचे (म.प्र.) प्रा.डॉ. संतोषकुमार सोनकर हे अनुवादक असून अकॅडेमिक पब्लिकेशन्स दिल्ली या प्रकाशन संस्थेने कविता संग्रह प्रकाशित केला आहे.
सदर कविता संग्रह मराठीत ‘म्होरकी’ या नावाने प्रसिद्ध असून हिंदीतही उपलब्ध आहे. मोट्यारिन किंवा म्होरकी या शब्दांचा अर्थ इंग्रजी भाषेत ‘लीडर’ असा असला तरी डॉ. सोनकर यांनी गोंडी भाषेतील ‘मोट्यारिन’ असाच शब्दप्रयोग केला आहे. उल्लेखनीय असे की ‘म्होरकी’ हा कविता संग्रह महाराष्ट्रातील बहुतेक विद्यापीठात अभ्यासला जात आहे व बरेच विद्यार्थी पीएच.डी. करीत आहेत.
इंग्रजीतील या अनुवादामुळे इंग्रजी भाषकांना सुद्धा आदिवासींची भाषा, संस्कृती, समाजजीवन व जगण्याची प्रेरणा यांचे दर्शन घडेल असा विश्वास उषाकिरण आत्राम यांनी व्यक्त केला असून डॉ. संतोषकुमार सोनकर यांचे व प्रकाशन संस्थेचे आभार मानले आहे.
तर शताली शेळमाके, बिच्चू वड्डे, नंदकिशोर नेताम, रमा टेकाम, प्रमोद ताराम, डॉ.फनीशसिंह कुसरे, रमेश कोरचा, कमलेश गोंड, डॉ. आकाश पोयाम, रमेश कासा, संध्या धुर्वे, ऍड. लालसू नागोटी, ऍड.भरत टेकाम, डॉ.के. एम.मैत्री, राजेश मडावी, रमेश शर्मा, शशी तिवारी, परेश दुरुगवार, मिलिंद गणवीर आणि माणिक गेडाम यांनी लेखिका उषाकिरण आत्राम, अनुवादक डॉ. सोनकर व अकॅडेमिक पब्लिकेशन्सचे अभिनंदन केले आहे.