
मोहीम कालावधीत वाटप केलेल्या गोळ्या खाल्ल्यास हत्तीपाय आजारावर नियंत्रण करणे शक्य
गोंदिया,दि.08ः- भारतात किटकजन्य आजाराच्या संबंधाने हिवतापा खालोखाल हत्तीरोग ही महत्त्वाची आरोग्याची समस्या निर्माण झालेली आहे. महाराष्ट्रात नागपूर, नांदेड, चंद्रपूर, ठाणे ,भंडारा, सोलापूर, वर्धा, यवतमाळ, गडचिरोली, गोंदिया इत्यादी जिल्ह्यात हत्तीरोग रुग्ण जास्त प्रमाणात आढळले जाते. गोंदिया जिल्ह्याचा विचार करता तालुकानिहाय हत्तीरोग रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे दिसून येते गोंदिया 146, तिरोडा 152, आमगाव 40, गोरेगाव 80, देवरी 18, सडक अर्जुनी 123, सालेकसा 9, व अर्जुनी मोरगाव 203 असे एकूण 771 लोकाना हत्तीपायरोग विक्रुति आढळली आहे. तसेच 573 अंडव्रुधिग्रस्त रुग्ण जिल्ह्यात आढळले आहे.
जिल्ह्यात खालील प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रात हत्तीपाय रुग्णाची संख्या जास्त प्रमाणात आढळून येते त्यात रावणवाडी, इंदोरा, सुकडी डाकराम, मुंडिकोटा, वडेगाव, ड्व्वा, पांढरी, खोड्शीवनी, कोरंबीटोला, केशोरी, महागाव, चान्ना बाक्ती, गोंदिया शहर , तिरोडा शहर व इतर भागात तुरळक प्रमाणात रुग्ण संख्या आहे.
या रोगामुळे रोग्यास अपंगत्व येऊन आर्थिक उत्पन्नावर परिणाम होतो. विद्रूपता व अपंगत्वामुळे रुग्ण लोकांमध्ये मिसळत नाही त्रासदायक होते. सद्यस्थितीत गोंदिया जिल्ह्यात हत्तीपाय रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून जिल्ह्यात प्रत्येक वर्षी एक दिवसीय सामुदायिक औषधोपचार मोहीम राबवली जात आहे मोहिमे दरम्यान आरोग्य कर्मचारी गृहभेटी देऊन प्रत्यक्षात डी.ई.सी. व अल्बेनडेजॉल गोळ्याची मात्रा वयोगटानुसार लोकांना खाऊ घालण्यात येत असतात. तसेच जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाकडून हत्तीरोग प्रतिबंधात्मक किट (एम.एन.डी.पी.किट) प्रत्येक हत्तीपाय रुग्णास वाटप करण्यात येत आहे. त्यासोबत आरोग्य कर्मचारी ती कीट कसे वापरावे या संबंधाने प्रात्यक्षिक करून दाखवत आहे .जिल्हा हिवताप विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णांच्या संख्येनुसार 771 किट वाटप केली असून त्याचा वापर करण्याचे तसेच शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालय येथे अंडव्रुधिग्रस्त लोंकाकरीता विनामुल्य ऑपरेशनची सुविधा करण्यात येते. तरी ऑपरेशन कॅप करिता जवळच्या आरोग्य केंद्रास सम्पर्क साधुन विनामुल्य ऑपरेशन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
वुचेरेरिया बॅक्रोफटाय व ब्रुग्रीया मलायी नावाच्या परजीवी जंतुमुळे हत्तीरोग हा आजार होतो आणी त्याचा प्रसार क्युलेक्स क्विंक्वीफेशिएटस या डांसामार्फत होतो. त्यांचे प्रजनन घाण व प्रदुषित पाण्यात होते. तरि सर्व लोकांनी जनजाग्रुतीने डासोत्पती स्थाने नष्ट करावे व घाण पाण्याचा निचरा व्यवसथीत होइल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.लोकांनी जिल्हा आरोग्य प्रशासनातर्फे मोहीम कालावधीत वाटप केलेल्या गोळ्या खाल्यास हत्तीपाय आजारावर नियंत्रण करणे शक्य आहे
– डॉ. वेदप्रकाश चौरागडे, जिल्हा हिवताप अधिकारी ,गोंदिया
हत्ती रोगाचा प्रसार डासांमार्फत होतो. दूषित व्यक्तीस डास चावला असता त्याच्या शरीरातील मायक्रो फायलेरिया रक्ताबरोबर डासांच्या शरीरात प्रवेश करतात. डासांच्या शरीरात त्याची वाढ व विकास होऊन ते संसर्गक्षम बनतात. डासांच्या सोंडेतून असा डास निरोगी माणसाला चावला कि त्या संसर्गक्षम सुक्ष्म अळ्या माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. माणसाच्या शरीरात प्रवेश होताच त्या सूक्ष्म अळ्या लसीका वाहिनीत प्रवेश करतात आणि साधारणतः सहा महिन्याच्या कालावधीत परिपक्व होतात. लसिका वाहिनीत प्रवेश करताच कालांतराने पायाला सूज होऊन त्यांची वाढ होते. डासांवर नियंत्रण व घाण नालिचे पाण्याचे नियोजन केल्यास हा आजार नियंत्रण शक्य आहे
– डॉ. नितीन वानखेडे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद गोंदिया