चंद्रपूर- बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सुप्रिया सुळे यांनी सहा जून रोजी सायंकाळच्या सुमारास रामाळा तलाव येथील इको-प्रो संस्थेच्या कार्यालयात भेट दिली. त्यांनी चंद्रपुरातील गोंडकालीन परकोट किल्ल्याची पाहणी करीत संस्थेने केलेल्या स्वच्छता कार्याची व सुरू असलेल्या हेरिटेज वॉक पर्यटनाची पाहणी केली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचे स्वागत केले. त्यांनी संस्थेचे कार्य व माहिती जाणून घेतली.
यावेळी ऐतिहासिक रामाला तलाव संवर्धनाचे प्रयत्न व शहरी तलाव संवर्धन मोहिमेची माहिती देत नैसर्गिक व ऐतिहासिक वारसा संवर्धनाकरिता ‘आपला वारसा, आपणच जपुया’ मोहिमेचे व सध्या सुरू असलेल्या ह्यमाझा हक्क – शुद्ध हवा अभियांनाचे सुरू असलेले कार्य व याचे महत्त्व समजावून सांगितले. जिल्ह्यात मागील सतरा-अठरा वर्षांपासून इको-प्रो संस्था पर्यावरण रक्षण, वन्यजीव संरक्षण, ऐतिहासिक वास्तू संवर्धन आपत्कालीन व्यवस्थापन, रक्तदान, आरोग्य या क्षेत्रामध्ये कार्य करीत आहे. आता नव्याने महिला सक्षमिकरण, बेरोजगार युवकांना उद्योग करण्यास आणि प्रेरित करण्यास लघु व गृह उद्योग क्षेत्रांमध्ये देखील एक उपक्रम संस्थेने पाऊल टाकले असून ह्यगावठी हेल्थ स्टोअर सुरू केले आहे. त्यासदेखील खा. सुप्रिया सुळे यांनी सदिच्छा भेट दिली. इको-प्रो संस्थेच्या कायार्चे, अविरत पर्शिम घेणारे सदस्य आणि कार्यकर्त्याचे अनुशासन विषयी विशेष कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. त्यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य आणि नितिन भटारकर यांची उपस्थिती होती. यावेळी संस्थेचे नितिन रामटेके, संजय सब्बनवार, अनिल अडगुरवार, मनीष गावंडे,अब्दुल जावेद सह अनेक महिला-युवक कार्यकर्ते सहभागी झाले होते.