
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान
अर्जुनी /मोर ता.9:- महाराष्ट्र शासनाने रोवलेली संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाची मुहूर्तमेढ गेल्या 22 वर्षांपासून अविरत सुरु आहे. हे अभियान सामाजिक अभिसरणाचे माध्यम व्हावे असे प्रतिपादन गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अनील पाटील यांनी (ता.9) केले. तालुक्यातील पवनी /धाबे इथं भेट देऊन त्यांनी संपूर्ण गावाची पाहणी केली दरम्यान आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्ष पदावरून बोलत होते.
यावेळी मंचावर जिल्हा स्तरीय समितीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेश भांडारकर, शिक्षणाधिकारी कादर शेख, जिल्हा आरोग्य अधिकारी नितीन वानखेडे,गट विकास अधिकारी विलास निमजे,विस्तार अधिकारी जि. टी. सिंगणजूडे,जि. प.महिला व बालकल्याण विभागाचे विनोद जाधव,बी. के. रहांगडाले, राजेश उखळकर, सरपंच श्रीमती पपीता नंदेश्वर, उपसरपंच पराग कापगते उपस्थित होते.पुढे बोलताना सीईओ श्री पाटील म्हणाले की,शासनाच्या योजनेचा गरजू लाभार्थ्यांनी जरूर फायदा घ्यावे परंतु जसं आपलं घर आपण स्वच्छ ठेवतो तसेच प्रयत्न गावाकऱ्यांनी आपल्या गावाच्या स्वच्छतेसाठी करावे असा सल्ला त्यांनी दिला.यावेळी शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामपंचायतिची संपूर्ण माहिती त्यांनी घेतली.
गोंदिया जिल्हा परिषदेच्या गोठणगाव गटातून प्रथम क्रमांक पटकविल्या मुळे पवनी /धाबे ग्रामपंचायतिची तपासणी मा. मुख्यकार्यकारी अधिकारी आणि त्यांच्या चमुने केली आहे.गावातील लोकांनी संयमस्फुर्त लोकसहभागातून हे अभियान राबविले आहे.
पाहुण्यांचं आगमन होताच त्यांच पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. दरम्यान सीईओ श्री पाटील यांनी जणनायक बिरसामुंडा यांच्या 122 व्या परिनिर्वाण दिना निमित्त त्यांना अभिवादन करून ध्वजारोहन केलं. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच श्रीमती नंदेश्वर यांनी, संचालन ग्रामसेवक पृथ्वीराज कोल्हटकर आणि आभार उपसरपंच श्री कापगते यांनी मानले, यावेळी मोठ्या संख्येने गावकरी नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कैलाश पंधरे, विकास टेम्भूरणे, टिकाराम दर्रो, सौ जोशीला पंधरे, सौ सुनंदा कवडो, सौ सुशी मडावी, सौ दिपिका चुटे,मुख्याध्यापक श्री खुणे, मुख्याध्यापक श्री दिहारी, मुख्याध्यापक रमेश गायकवाड,वैद्यकीय अधिकारी डॉ. दखणे, डॉ पाटील,पोलीस पाटील कुंभरे,आशा सेविका सौ. मंजुळा लंजे,श्रीमती फरदे,अंगणवाडी सेविका सौ.अंकिता इसकापे, सौ एकादशी पुसतोडे , देवकुमार हटवार, सतीश साखरे, तुलाराम वाढई यांनी सहकार्य केले.