युवा नेते रविकांत बोपचे यांच्या प्रयत्नांना यश |
तिरोडा-कोरोना काळात पालकत्व गमावलेल्या बालकांसाठी बाल संगोपन योजना सुरू करण्यात आली होती.
या योजनेतंर्गत तिरोडा तालुक्यातील लाभार्थी बालकांना राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते, रविकांत बोपचे यांच्या अथक प्रयत्नाने तालुक्यातील मौजा सर्रा, घोगरा, सुकळी, माल्ही, बुचाटोला, बिर्सी, तिरोडा येथील कोरोनामुळे पालक गमावलेल्या व एक पालक असलेल्या आर्शित १८ वषार्खालील एकूण १0 बालकांना बाल संगोपन योजनेतून प्रत्येकी ११00 रुपये प्रती महिना आर्थिक सहाय्य अनुदान त्यांच्या वयाचे १८ वर्षे पुर्ण होई पयर्ंत मिळणार आहे.
कोरोना काळात अनेकांनी आपल्या कुटूंबातील कर्ता व्यक्ती गमावला आहे.कोविड-१९च्या विषाणूची लागण झाल्यामुळे व वेळेवर उपचार न झाल्यामुळे तालुक्यातील बहुतेक नागरिकांना आपला जिव गमावा लागला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या बहुतांशी नागरिकांच्या कुटुंबात १८ वर्षाखालील मुले होती. त्यांच्या कुटुंबातील प्रमुख कमावणारी व्यक्ती गेल्यामुळे व त्या बालकांना दुसर्यांवर आर्शित राहण्याची वेळ आलेली होती.
तालुक्यातील मौजा सर्रा, घोगरा, सुकळी, माल्ही, बुचाटोला, बिर्सी, तिरोडा येथील एक पालक असलेल्या बालकांच्या नातेवाईकांनी या आर्शित बालकांना शासकीय योजनेतुन लाभ मिळावे याकरिता राष्ट्रवादी कांग्रेसचे युवा नेते रविकांत (गुड्डु) बोपचे यांना निवेदन दिलेले होते.
त्यांच्या निवेदनांना प्राधान्य देत युवा नेते रविकांत बोपचे यांनी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणार्या बाल संगोपन योजनेत या बालकांना सामावुन घेत त्यांना योजनेतुन प्रती बालक/ प्रती महिना ११00 रुपये आर्थिक सहाय्य मिळवून देण्याकरिता जिल्हास्तरीय संबंधित विभागात पाठपुरावा केला व अनुदान मंजूर करून दिले.
या बालकांना व कुटुंबियांना काहीसा आधार मिळालेला आहे व यातुन त्यांना त्यांच्या शिक्षणात मदत होणार असल्यामुळे लाभार्थ्यांनी व त्यांच्या नातेवाईकांनी रविकांत बोपचे यांचे आभार मानलेले आहे.