गोंदिया :- “विदर्भातील विद्यार्थ्यांचे भविष्य सर्वस्वी शिक्षणावर अवलंबून आहे. मात्र, उच्च दर्जाच्या शिक्षणापासून आजही आपण वंचित आहोत. हे शिक्षण आपल्याला संघर्षाशिवाय मिळू शकणार नाही. संघर्षाला योग्य दिशा मिळावी म्हणून विदर्भातील तरुणांना आता विद्यापीठाच्या राजकारणात सक्रीय सहभाग घेणे अत्यावश्यक आहे” असे प्रतिपादन या सभेला संबोधित करण्यासाठी प्रामुख्याने उपस्थित असलेले तसेच पदविधर मतदार संघाची निवडणूक प्रबळतेने लढलेले युवा ग्रेजुएट फोरम प्रमुख अतुल दादा खोब्रागडे (नागपूर) यानी केले.
▪️राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (आरटीएम) विद्यापीठ सिनेट निवडणुकी संदर्भातील महत्त्वाची बैठक युवा ग्रेजुएट फोरम, आता लढुया एकीनेच, संविधान मैत्री संघाच्या संयुक्त वतीने गोंदिया येथील विश्रामगृहात आयोजित करण्यात आली. सदर बैठकीत ते बोलत होते. या प्रसंगी संविधान मैत्री संघाचे अतुल सतदेवे, ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळ प्रमुख वसंत गवली, पुरुषोत्तम मोदी, ओबीसी सेवा संघातर्फे साहित्यिक सीपी बिसेन, कैलाश भेलावे, देवचंद खोब्रागडे, युवा बहुजन मंच तर्फे सुनील भोंगाड़े, रवि भांडारकर, गोंडवाना मित्र मंडळचे प्रा. नीलकंठ चिचाम, हितेंद्र रामटेके, एनएनबीवाय तर्फे विश्वजीत बागड़े, सेवा निवृत्त सैनिक सोनू सोनवाने, अरुण बन्नाटे, विद्यार्थी प्रतिनिधि म्हणून अक्षय कड़बे, सुनिल सहारे, संघदीप पानेकर, पंकज, विवेक पानेकर प्रामुख्याने उपस्थित होते. या बैठकीत विद्यापीठीय सिनेट निवडणुकीबद्दल युवा वर्गात जागृती निर्माण करणे, पुरोगामी विचारसरणीच्या विविध समविचारी संघटनांना घेऊन एकजुटीने निवडणूक लढवणे, त्यासाठी अधिकाधिक पदविधारकांची नोंदणी करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.या चर्चा बैठकीत सर्व घटक, समाज संघटन पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संचालन अतुल सतदेवे यानी केले तर वसंत गवळी यानी उपस्थितांचे आभार मानलें. स्थानिक चंद्रशेखर वार्ड स्थित एमजी पैरामेडिकल कॉलेज येथे पदवीधर विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन कार्यक्रम तसेच तिरोडा शहरातील डॉ. आंबेडकर वाचनालयात युवकांचे मार्गदर्शन करण्यासाठी स्थानिक मंडळतर्फे चर्चा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. युवा ग्रेजुएट फोरम तर्फे अतुल खोब्रागडे यानी आयोजित तीनही चर्चा सभेला संबोधित केले.