श्री गणेश शिक्षण संस्थेच्यावतीने योगदिवस उत्साहात
गोंदिया,दि.21- जागतिक योगा दिवसांच्या निमित्ताने श्री गणेश ग्रामीण विकास शिक्षण संस्था गोंदिया द्वारा संचालित बाहेकर व्यसन मुक्ती केंद्र गोंदिया, राधाबाई बाहेकर नर्सिंग स्कूल गोंदिया, शिक्षण संस्था गडचिरोली, ज्ञानयोगी श्रीकांत जिचकार मॉडल स्कूल आमगावच्या संयुक्त विद्यमाने राधाबाई बाहेकर नरसिंग स्कूलच्या गर्ल्स होस्टेलच्या प्रांगणात योगा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. आजच्या या योगा दिवस कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विजय बाहेकर (संस्थापक श्री गणेश ग्रामीण विकास शिक्षण संस्था) गोंदिया, तसेच सत्यप्रकाश मेहरा(राजस्थान),पांडे,देवेंद्रसिंह मच्छिरके,जगदीश पारधी,डॉ.फुंडे,तसेच उषा घोडेस्वार प्रामुख्याने उपस्थित होते.योग शिक्षक पामेश गजभिये यांनी यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.बाहेकरजी व्यसन मुक्ती केंद्रातील सर्व लाभार्थी, राधाबाई बाहेकर नर्सिंग स्कूलचे विद्यार्थी, विद्यार्थी विद्यार्थिनीं, प्यारामेडिकल ट्रेनिंगचे आदिवासी क्षेत्रातील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी तसेच परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला होता.सूत्रसंचालन व आभार शालू कृपाली यांनी केले.
आयुष भारत ने विविध राज्यांमध्ये केली योगसाधना; आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
जागतिक योग दिन देशात उत्साहात साजरा झाला. शहरातील व ग्रामीण भागातील विविध ठिकाणी योगासनांचा प्रचार व प्रसार आयुष भारत संस्थांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच कर्मचाऱ्यांनीही केले योगासने करत सुदृढ आरोग्य राखण्याचा निश्चय केला. आयुष भारत तर्फे योग दिन देशात उत्साहात साजरा करण्यात आला आयुष भारत संस्थापक अध्यक्ष डॉ.अमीर मुलाणी व योग शिक्षिक डॉ.शाहिन मुलाणी यांनी सूर्यनमस्कार व प्राणायाम यांची माहिती देत उपस्थितांकडून त्याचा सराव करून घेतला. आंतरराष्ट्रीय योगा समुपदेशक डॉ.जलील शेख यांनी व्यक्तिमत्त्व विकासासाठी योगासनांचे फायदे सांगितले. आयुष भारत राष्ट्रीय सचिव डॉ.किशोर बोकील यांनी योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली. आयुष भारत तर्फे डॉ.गायत्री हजारे यांना ‘योग आचार्य’ या उपाधीने सन्मानित करण्यात आले. डॉ.किशोर बोकील यांच्या पुढाकाराने झालेल्या या उपक्रमांमध्ये आयुष भारत राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अमीर मुलाणी, डॉ.शाहिन मुलाणी, डॉ.गायत्री हजारे, डॉ.सुहास शेवाळे, डॉ.रसुल पठाण (पुस), डॉ.काशिनाथ माळी, डॉ.राजे मॅडम, डॉ.सिता भिडे, डॉ.शब्बीर पठाण, डॉ.फिरोज पठाण, डॉ.नवले सर सातारा व आदी मान्यवर उपस्थित होते. आयुष भारत राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अमीर मुलाणी यांनी योगनिकेतनच्या योग शिक्षकांना आमंत्रित केले होते. डॉ.राजे मॅडम त्यांनी योगसाधनेचे महत्त्व सांगितले. त्यानंतर प्रार्थना, शांतीपाठ, प्राणायाम, योगासने व सूर्यनमस्कार करण्यात आले.आयुष भारत यांच्यातर्फे देशातील विविध राज्यांमध्ये योगासनांचे कार्यक्रम घेण्यात आले.
कुणबिटोला ( ककोडी) शाळेत विश्व योगासन दिन साजरा आज २१ जुनला जागतिक योग दिनानिमित्त शांताबाई पुर्व माध्यमिक शाळा कुणबिटोला( ककोडी) येथे योगासन करून योग दिन साजरा करण्यात आला.श्री.कानतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी आणि विद्यार्थीनी यानी योगासन केले. योगासन केल्याने आपन कसे निरोगी राहु शकतो यावर विद्यार्थाना मार्गदर्शन केले.यावेळी शाळेचे मुख्याधापक विजय बावनथळे, दिलीप मळावी उपस्थित होते.