खोडशिवनी येथे विंधन विहिरीचे भूमिपूजन

0
21

सडक अर्जुनीPतालुक्यातील खोडशिवनी येथे आ. परिणय फुके यांच्या स्थानिक विकास निधीतून जोतिबा स्मारक समिती (सिद्धार्थ नाटक मंडळ) येथे विंधन विहिरीचे भूमिपूजन करण्यात आले. यासाठी भाजयुमो महामंत्री हर्ष मोदी यांनी सतत पाठपुरावा केला होता.
खोडशिवनी येथील जोतिबा स्मारक समिती (सिद्धार्थ नाटक मंडळ) येथे विंधन विहिरीची नितांत आवश्यकता होती. या संदर्भात भाजयुमो महामंत्री हर्षकुमार मोदी हे सतत पाठपुरावा करीत होते. दरम्यान आ.परिणय फुके यांच्या स्थानिक विकास निधीतून विंधन विहिरीला मंजूरी प्रदान करण्यात आली. विंधन विहिरीचे २१ जून रोजी भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी भाजयुमोचे जिल्हा महामंत्री हर्ष विनोदकुमार मोदी, संगीता खोब्रागडे, निशा तोडासे, वर्षा सहारे, उर्मिला कंगाले, डॉ. बी. वाळई, टेकराम परशुरामकर, राज परशुरामकर, राजू परशुरामकर, मनोहर परशुरामकर, नरेंद्र लंजे, दसरत लंजे, ग्यानेद्र बंसोड, सत्यवान परशुरामकर, सुभाष मेर्शाम, प्रकाश कानेकर, उमेश इलमकार, भीमराव इलमकार, रामकृष्ण खोब्रागडे, ओगंन खोब्रागडे, माधवराव खोब्रागडे, वामन इलमकार आदी कार्यकर्ता व गावकरी उपस्थित होते.