अर्जुनी मोरगाव,दि.03ः तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र गोठणगाव येथे जन आरोग्य समितीची आढावा बैठक जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व आरोग्य सभापती इंजि.यशवंत गणविर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सदर बैठकीत प्राथमिक आरोग्य केंद्र गोठणगावचे वार्षिक नियोजन,केंद्रातील समस्या, औषधांचा साठा व वापर अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.यावेळी इंजि.गणविर यांनी आरोग्य सेवा सर्वजनतेला उपलब्ध करुन देण्यासाठी आपले प्रयत्न सर्वोतोपरी राहणार असल्याचे सांगत जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा असल्याचे म्हटले.
सदर बैठकीला तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ.विजय राऊत, डॉ.सुरेंद्र खोब्रागडे,जि.प.सदस्या कविता कापगते,पं.स.सदस्या आम्रपाली डोंगरावर,ग्रा.प.सदस्या हर्षाताई राउत,पं.स.उपसभापती होमराज पुस्तोडे,अशोक सरकार,जयंत राऊत,अशोक कापगते,रतिराम राणे, रविंद्र घरतकर, विनोद किरसान, कृष्णा मांडवे,संजय ईश्वार,तुलशिदास कोडापे तथा समीतीचे सर्व सदस्य व आरोग्य केंद्र गोठणगावचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुरेंद्र खोब्रागडे,संचालन एस.आर.पारधी व आभारप्रदर्शन डॉ.मडावी यांनी केले.