
अर्जुनी मोर- तालुक्यातील पिंपळगाव /खांबी येथील ग्राम पंचायतमध्ये सन २00५ पासून सन २0२१ पयर्ंत कार्यरत असलेले कर्मचारी भाऊराव केवळराम वलथरे यांचे आकस्मिक मृत्यू झाला. भाऊराव हा कुटूंबात कमावता व्यक्ती होता. त्यामुळे वलथरे कुटूंबावर आर्थिक संकट कोसळले. वारसान हक्क व सामाजिकता जोपासून ग्राम पंचायत प्रशासनाकडून त्याच्या मुलीला कामावर घेणे गरजेचे आहे. मात्र, ग्राम पंचायतचे पदाधिकारी जाणीवपूर्वक कामावर घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. असा आरोप उत्कर्षा वलथरे हिने केले आहे. न्याय न मिळाल्यास ५ जुलैपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा तिने दिला आहे.
पिंपळगाव/खांबी येथील ग्राम पंचायतमध्ये भाऊराव वलथरे हा १ मे २00५ पासून ते ३ एप्रिल २0२१ पयर्ंत ग्रामीण पाणीपुरवठा कर्मचारी म्हणून कार्यरत होते. ते ४ जून २0२१ ला मरण पावले. नियमानुसार विंष्ठबहुना सामाजिकता जोपासत मृत्यू झालेल्या कर्मचाठयाच्या कुटूंबातील एखाद्या व्यक्तीला कामावर घेणे गरजेचे असते. त्यानुरूप वलथरे यांची मुलगा उत्कर्षा ही योग्य आहे. या अनुसंगाने उत्कर्षाने ग्राम पंचायतीकडे अर्ज देखील केले होते. मात्र, १८ वर्ष पूर्ण व्हायचे आहे, असे सांगून ग्राम पंचायत प्रशासनाकडून तिचे अर्ज स्विकारण्यात आले नाही. सहा महिन्यानंतर १८ वर्ष पूर्ण झाल्याने तिने पुन्हा अर्ज केले. मात्र, तिच्या ऐवजी इतर दुसठयाला नियुक्ती देण्यात आली आहे. एंकदरीत या प्रकरणात सरपंच इतर पदाधिकारी जाणीवपूर्वक उत्कर्षाला कामावर घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. या अन्यायाला त्रासून उत्कर्षाने ५ जुलैपासून पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याची भुमिका स्विकारली आहे. या संदर्भात वरिष्ठांकडे निवेदनही करण्यात आले आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून या प्रकाराची दखल घेवून उत्कषार्ला न्याय मिळणार काय? याकडे लक्ष लागले आहे.