
दक्षिण पुर्व मध्य रेल्वेने जारी केले दुसऱ्यांदा पत्र
देसाईगंज दि.९- अतिदुर्गम आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्टेशन असलेल्या वडसा रेल्वे स्टेशन च्या वडसा रेल्वे सल्लागार समितीत शहरातील दहा जणांची नियुक्ती २७ आगस्ट २०२१ अन्वये दक्षिण पुर्व मध्य रेल्वे नागपुर च्या विभागीय कार्यालयाचे पत्रांवये दोन वर्षांकरिता वरिष्ठ विभागीय वाणीज्यीक व्यवस्थापक यांनी नियुक्तीचे आदेश निर्गमित केले होते. ह्या नियुक्तीचा कालावधी दुसऱ्यांदा वाढवून ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत करण्यात आले असल्याचे रविश कुमार सिंह वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर यांनी दि २३ जुन २०२२ ला कळविले आहे.
वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर या कार्यालयातील पत्र क्रमांक जी२७/एस एस सी/ मीटींग/२०२०-२१ दि २७ आगस्ट २०२१ अन्वये दि १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत वडसा रेल्वे सल्लागार समिती गठीत करण्यात आले होते. परंतु मंडळ रेल्वे प्रबंधक नागपूर यांच्या आदेशानुसार वर्तमान वडसा रेल्वे सल्लागार समितीच्या कार्यकारिणीला दि १ जानेवारी २०२२ ते ३० जुन २०२२ पर्यंत पहिली मुदतवाढ देण्यात आले होते. तथापि मंडळ रेल्वे प्रबंधक नागपूर यांच्या अनुमोदनानंतर वडसा रेल्वे सल्लागार समितीचा कालावधी दुसऱ्यांदा दि १ जुलै २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत वाढविण्यात आले असल्याचे दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर चे वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक रविश कुमार सिंह यांनी पत्र क्रमांक जी२७/एस एस सी/ मीटींग/२०२१-२२ दि २३ जुन २०२२ च्या पत्रांवये कळविले आहे.
ही आहे वडसा रेल्वे सल्लागार समिती कार्यकारिणी
वडसा रेल्वे सल्लागार समिती मध्ये राजेश जेठानी, डॉ विष्णु वैरागडे, दिपक विधाते, नरेश विठलानी, शालुताई दंडवते, संतोष शामदासानी, कोडंधारी नाकाडे,सचिन खरकाटे,प्रितपालसिंग टुटेजा आणि ऋषी शेबे या दहा जणांचा समावेश असुन सदर वडसा रेल्वे सल्लागार समिती पुन्हा ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत कार्यान्वित राहणार आहे. मुदतवाढीचे श्रेय गडचिरोली चिमुर लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांना देण्यात आले आहे.
समितीचे असते अहम भुमिका
वडसा रेल्वे स्टेशन चा सर्वांगीन विकास साधण्यासाठी रेल्वे सल्लागार समितीची भुमिका अहम मानल्या जात आहे. वडसा रेल्वे सल्लागार समिती ने मागील सहा वर्षापासून दक्षिण पुर्व मध्य रेल्वे च्या वरिष्ठ अधिकाय्रांकडे सातत्याने मागणी व पाठपुरावा केल्यानेच वडसा रेल्वे स्टेशनवर अनेक विकासात्मक योजना राबविण्यात आले आहेत हे विशेष.