
गोंदिया: ग्रामीण भागात नागरिकांना प्राथमिक आरोग्य विषयक सेवा वेळेवर पुरविल्यास व स्वच्छता संबंधित योग्य दक्षता घेतल्यावर स्वस्थ समाजाचा निर्माण होईल, तसेच आरोग्य विभाग व स्थानिक पदाधिकारी -कर्मचारी यांनी योग्य तालमेल बसवुन काम केल्यास उत्कृष्ठ आरोग्य सेवा देता येईल असे वक्तव्य बांधकाम व वित्त सभापति संजय टेंभरे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र रावनवाड़ी इथे आयोजित आढावा बैठकीत दिले.
बैठकीत तालुका आरोग्य अधिकारी, सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका तसेच रावनवाड़ी आरोग्य केंद्रान्तर्गत येणाऱ्या सर्व 10 ग्रामपंचायत व सर्व गावातील सरपंच/उपसरपंच, ग्रामसेवक, शिक्षकवर्ग, आंगनवाड़ी सेविका, आशा कार्यकर्ता व स्थानिक नागरिकांच्या उपस्थितित विविध आरोग्य विषयक विषयांवर चर्चा करण्यात आली. कार्यक्षेत्रातील सर्व गावात कोविड-19 लसिकरण 100% व्हावे याकरिता तातळीने कार्य करावे, तसेच पावसाळ्यात कोणतेही रोगराई पसरू नये याकरिता आवश्यक उपाय-योजना करावी असे निर्देश यावेळी सभापति टेंभरे यांनी दिले. सर्व आरोग्य उपकेंद्र, आंगनवाड़ी इमारती तसेच सर्व शाळेत विद्यार्थ्यांना व नागरिकांना योग्य सुविधा मिळाव्यात याकरिता जिल्हा परिषद निधि कमी पडू देणार नाही असी ग्वाही उपस्थितांना संजय टेंभरे यांनी दिली. सभेत अनेक आंगनवाड़ी सेविकांनी इमारत बांधकाम व इतर सुविधा बाबत तक्रार उपस्थित केले, यावर बांधकाम विभागामार्फत लवकरच आवश्यक नियोजन केले जाईल व क्षेत्रातील सर्व आंगनवाड़ी, शाळा, ग्रामपंचायती, उपकेंद्र यांच्या इमारतीत आवश्यक असलेल्या कामांची मागणी बांधकाम विभागाला करावे उसे आग्रह सभापति यांनी यावेळी बोलताना केले.
सदर सभेला तालुका वैद्य.अधिकारी डॉ.चौरागड़े, जि.प. सदस्या कु.वैशाली पंधरे, घिवारी प.स.सदस्या सौ.कटरे, भाजयुमो तालुका अध्यक्ष तिजेश गौतम, वैद्य.अधिकारी डॉ. शुभम बिसेन, डॉ. अश्मिता दीक्षित, रावनवाड़ी सरपंचा सौ.शिला वासनिक, नागरा सरपंच धनलाल नागपुरे, गर्रा सरपंच कुलदीप पटले, सावरी सरपंचा सौ.माधुरी पटले, अंभोरा सरपंच चिंतामन चौधरी, घिवारी सरपंचा सौ.फरकुंडे, राजकुमार रनगिरे, कैलाश दाउदसरे, उमेश बावनकर व स्थानिक वरिष्ठ नागरिक उपस्थित होते.