*सडक अर्जुनी::–आता गॅसचे दर दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आता सर्वसामान्य माणसाचे गॅसवर स्वयंपाक करणे, आता आवाक्या बाहेर होत आहे.सध्या गॅस सिलेंडरचे दर आकाशाला भिडल्याने ,आता स्वयंपाक गॅसवर करायचा की चुलीवर , असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात येऊन ठेपला आहे.
वन विभागाच्या माध्यमातून आत्ता बहुतेक गावात त्यात शेंडा, कोकणा/जमी, डेपो /डोंगरगाव ,पांढरी, सौंदड , डव्वा , जांभळी, रेंगेपर आदी परिसरात वन विभागाच्या माध्यमातून घरोघरी गॅस सिलेंडरची अनुदानावर वितरण करण्यात आले आहे. पण आता गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भिडल्यामुळे गॅस पेटवायची की ,चूल हाच प्रश्न आता गोरगरीब जनतेसमोर पडला आहे.
नवेगाव _ नागझिरा व्याघ्र प्रकल्प अंतर्गत लगत असलेल्या गावांमध्ये डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी समितीच्या माध्यमातून 75 %अनुदानावर जवळजवळ सर्वच लोकांना गॅस सिलेंडरची वाटप करण्यात आले होते, त्याचप्रमाणे वनपरिक्षेत्र अधिकारी सडक अर्जुनी अंतर्गत येणाऱ्या संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून 75 %अनुदानावर लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे वाटप करण्यात आले होते.
……………
आम्ही खेड्यापाड्यात राहणाऱ्या महिला पूर्वी शेतातील , जंगलातील काड्या गोळा करून वर्षभर चुलीवर स्वयंपाक करून संसाराचा गाळा ओढत होतो ,पण शासनाच्या माध्यमातून गॅस सिलेंडर दिले . रोज गॅस सिलेंडरची सवय झाल्यामुळे आता चुलीवर स्वयंपाक करणे अवघड झाले आहे . पण गॅसच्या किमती वाढत असल्यामुळे आता गॅस सिलेंडर भरायचा कसा, हा मोठा पेज पुढें आला आहे.
मुक्ताबाई हत्तीमारे,खोबा
सध्या गॅस सिलेंडरचे भाव ११२५/- रुपये झाल्यामुळे, मुलांचे शिक्षण करायचे की गॅस घेऊन स्वयंपाक करायचा, कि स्वयंपाक चुलीवर करायचा का, पेच पडला आहे.दिवसेंदिवस महागाई आकाशाला भिडत आहे. अहो, स्वयंपाक चुलीवर करू की गॅसवर , अशी नवऱ्याला विचारण्याची वेळ आली आहे.चुलीवर स्वयंपाक करण्याचे, जुने दिवसच बरे होते , असे वाटते.
सौ. लीना नरेश मेंढे,वडेगाव
………….
शासनाने आम्हाला गॅस सिलेंडर अनुदानावर देऊन गॅसची सवय लावल्यामुळे आता चुलीवर स्वयंपाक करणे ,फार त्रासदायक वाटत आहे, पण स्वयंपाक करायचा कसा, हा विचार मनात येतो.
शकुंतला रेवदास दरवडे,कोकणा/ जमीदारी