तावशी बायपासवर ट्रॅक्टर उलटला, जीवित हानी टळली

0
20

अर्जुनी-मोरगाव : खड्ड्यांचे साम्राज्य असलेल्या तावशी बायपास रस्त्यावर मालवाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटला. सुदैवाने जीवित हानी टळली. अपघातग्रस्त ट्रॅक्टर Mh-34 AP-5330 या क्रमांकाचा आहे. सदर ट्रॅक्टर धानाची वाहतूक करीत होते. दरम्यान परिसरातील नागरिकांनी ट्रॅक्टर चालकाला मदत केली. तीन वर्षापासून या रस्त्याची दयनीय स्थिती आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष आहे. वर्षभर आधी तालुका काँग्रेसने या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी रास्ता रोको आंदोलन केले होते. मार्च बजेटमध्ये या रस्त्यासाठी तरतूद झाल्याची माहिती आहे. मात्र रस्त्याचे नूतनीकरण कधी होईल या प्रतीक्षेत नागरिक आहेत.

शहरातील बहुचर्चित तावशी बायपास रस्त्याची गेल्या तीन वर्षापासून दयनीय अवस्था आहे. कधीकाळी डांबरीकरण असलेल्या या रस्त्यावरून अख्खा रस्ता गायब आहे. शहरातून होणारी जड वाहतूक या मार्गे राज्य मार्गाला वळती करण्यासाठी हा मार्ग आहे. राज्यमार्ग ते लाखांदूर रोड अशी वाहतूक या मार्गाने होत असल्याने अतिवर्दळीचा मार्ग आहे. सध्या या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य आहे. वाहन कुठून काढावे हा प्रश्न चालकांना पडतो. लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून हा रस्ता नागरिकांसाठी सुरळीत करून द्यावा, अशी मागणी होत आहे.