
तिरोडा,दि.10ः- तालुक्यातील सुकडी (डाकराम)येथे सिमेंट रस्ता व नाली बांधकामासह इतर कामांचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य जगदिश (बालु)बावनथड़े यांच्या हस्ते पार पडले.या कामामध्ये देवघर टोली येथे सिमेंट रस्ता बांधकाम 6 लक्ष रुपये,आंबेडकर वार्ड येथे सिमेंट रस्ता बांधकाम 6 लक्ष,इंदिरानगर येथे सिमेंट रस्ता बांधकाम 9 लक्ष व इंदिरानगर येथे सिमेंट नाली बांधकाम 2 लक्ष रुपयाचा समावेश आहे.यावेळी सरपंच जयश्री गभने,उपसरपंच निलेश बावनथड़े,सचिव कु.चन्द्रकला कटरे,ग्रा.पंचायत सदस्य दिलीप बावनथड़े,जयश्री चन्द्रिकापुरे,राजु ऊके,राजेन्द्र मेश्राम,उमेश मेश्राम,सतीश सूर्यवंशी, मुन्ना उके, सुरेश रायकर, राजकुमार शेंडे, रमेश गेडाम, राजकुमार बोरकर,हर्षवर्धन मेश्राम,शामू उके,उमेश बावनथड़े व गावातील नागरिक उपस्थित होते.