बोदा येथे वीज कोसळून बैलजोडी ठार

0
26

तिरोडा, दि.10 : तालुक्यातील ग्राम बोदा येथील तिरथलाल बालचंद पारधी यांच्या शेतात रोहिणीचे काम सुरू होते. त्यामुळे  ते बैलजोडी दतार घेऊन शेतातील दुसऱ्या बांधीत नेत होते. दरम्यान वीज कडाडली व वीज पडून बैलजोडी ठार झाली. ही घटना आज रविवार, 10 जुलै रोजी दुपारी एक ते दीड वाजताच्या दरम्यान घडली.बैलजोडी ठार झाल्याने शेतकर्‍याचे मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही बैलांची किंमत 50 हजार रुपये होती. घटनेची माहिती तहसीलदार प्रशांत घोरूडे यांना पंस उपसभापती हुपराज जमईवार यांनी दिली आहे.घटनास्थळी उपसभापती हुपराज जमईवार, पंचायत समिती सदस्य डॉ.चैतलाल भगत, संरपच निशा पारधी, बंडू पारधी यांनी भेट दिली. तसेच शेतकऱ्यांना शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी केली. घटनेचा पंचनामा मंडळ अधिकारी डी.एच. पोरशेटीवार व तलाठी पी.एस. आचले यांनी केले.