
तिरोडा : मंडल दिनाचे औचित्य साधून OBC, VJNT, SBC जनजागृती अभियान विदर्भातील 7 जिल्ह्यात 1 ते 7 ऑगस्ट 2022 पर्यंत करण्यात येत आहे. ही मंडल यात्रा नागपूरवरून भंडारा, तुमसर, तिरोडा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा या मार्गाने जनजागृती करीत नागपुरात या यात्रेचा समारोप होणार आहे. मंडल यात्रा गोंदियाला जात असताना 2 ऑगष्ट रोजी चवळे कॉम्प्लेक्स तिरोडा चुरडी रोड येथे बहुसंख्येने OBC बांधवांनी सदर यात्रेचे उल्हासात स्वागत केले.
यावेळी मंडल यात्रेचे संयोजक उमेश कोराम, संघर्ष वाहिनेचे संयोजक दीनानाथ वाघमारे, मुकुंद आडेवार, धीरज भिसिकर, संजीव भुरे, बबलू कटरे, खेमेन्द्र कटरे,कैलास भेलावे, राजू चामट यांनी OBC व मंडल आयोग, मागासवर्गीयांचा लढा व इतिहास, कार्लेकर आयोग, बार्टी व सारथीच्या धर्तीवर महाज्योतीचे कार्य, ओबीसीसाठी लढा का गरजेचा आहे, जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे, मंडल आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, महाराष्ट्रात 36 जिल्ह्यात 72 वसतिगृह सुरु करावेत, 27 टक्के आरक्षण मिळावे, OBC आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावेत इत्यादी मागण्यासाठी संघर्ष करण्यास तयार राहण्याचे आवाहन केले.
मंडल यात्रेमध्ये आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षी ओबीसींच्या हक्क आणि अधिकारासाठी लढाई लढण्यासाठी तयार झालेला बहुजन समाज पाहून खूप आनंद झाला. आपले संविधानिक मूलभूत हक्क आणि अधिकार यासाठी स्वातंत्र्य काळापासून आतापर्यंत होत आलेला ओबीसीवर अन्याय आणि अत्याचार याला वाचा फोडण्यासाठी ओबीसी कर्मचारी महासंघ व ओबीसी संघर्ष कृती समितीचे पदाधिकारी या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित होते. आपल्या मूलभूत हक्काच्या आणि कर्तव्याच्या जाणिवेसाठी आज सर्व बांधव/ओबीसी बांधव एकत्र आले आणि लढाई लढण्यासाठी तयार झाले.
आपली ही पिढी नोकरी पेशातील शेवटची पिढी असू नये तर पुढेही शासकीय कर्मचाऱ्यांची भरती व्हावी. आपले संविधानिक अधिकार/मूलभूत अधिकार प्राप्त व्हावे, असे मार्गदर्शन करण्यात आले.
तिरोड्यात मंडल यात्रेच्या स्वागतप्रसंगी डी.एच.चौधरी, सुनील पालांदूरकर, पी आर पारधी, ए डी शरणागत, विलास डोंगरे, आर एच ठाकरे, नरेंद्र आगाशे, वाय बी चौव्हान, पी टी रंगारी, टी के बोपचे, प्रविण दमाहे, नोकलाल शरणागत, जे डी कडव, दयानंद पटले, जी आर बोपचे, परिहार, एम एन रहांगडाले, दयानंद बोपचे, राजू गाढवे, आर एफ पटले, गिरीधारी रहांगडाले, दिलीप शेंडे, भावेश तीतीरमारे, अरविंद उके, शिला पारधी यासह अनेक ओबीसी बांधव बहुसंख्येने हजर होते.प्रास्ताविक अमृत शरनागत यांनी मांडले. संचालन शितलकुमार कनपटे यांनी केले. आभार डी एच चौधरी यांनी मानले.