मागासवर्गाची जनगणना हेच अंतिम सत्य-उमेश कोराम

0
22

अर्जुनी मोरगाव येथे मंडल यात्रेचे जल्लोषात स्वागत
अर्जुनी मोर(संतोष रोकडे)- घटनादत्त अधिकार असताना नागरिकाच्या मागास प्रवर्गास राजकीय, शैक्षणिक, नोकरी ,वसतीगृह, शिष्यवृत्ती पासून वंचित केल्या जाते .सरकार येथे जाते परंतु सर्व सरकार जातीय जनगणने पासून आम्हास वंचित ठेवते. वारंवार आरक्षणाचे गाजर दाखवीते. आता नागरिकांच्या मागास प्रवर्गातील लोकांनी वज्र मूठ आवळून जनगणनेची एकमुखी मागणी करावी मागासवर्गाची जनगणना हेच अंतिम सत्य असल्याची प्रतिपादन मंडळ यात्रेचे प्रमुख उमेश कोराम यांनी केले.
कृषी उत्पन्न बाजार समिती अर्जुनी मोरगाव येथे 1 ते 7 ऑगस्टपर्यंत विदर्भात जनजागरण करणाऱ्या मंडल यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. मंडल आयोगाच्या यात्रेचे प्रमुख उमेश कोराम म्हणालेत की ,जनगणना झाली तर क्रिमिलियर ची अट रद्द होईल ,आपली लोकसंख्या कळेल ,केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद होइल,प्रत्येकाला घरकुल मिळेल, विधानसभा, लोकसभेत आरक्षण मिळेल ,नोकरीत पदोन्नती होणार, शेतकऱ्यांना मोफत कृषी संसाधने ,अवजारे मिळतील, वैद्यकीय क्षेत्रात आरक्षण ,देश विदेशात विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्तीच्या लाभ मिळेल यासाठी जनगणना हेच अंतिम उपाय असल्याचे म्हणाले.
यावेळी मार्गदर्शन करताना दीनानाथ वाघमारे म्हणाले, की नागरिकांच्या मागास प्रवर्गातील ओबीसी, एसबीसी, व्हिजे एनटी व इतर जातीतील विद्यार्थ्यांना मोफत वसतीगृह ,सारथी ,महाज्योती मध्ये लाभ भेटून एमपीएससी, यूपीएससी द्वारे आपले भविष्य घडवू शकतात यासाठी प्रत्येकानी जनगणनेच्या आग्रह करणे गरजेचे आहे. खेर्मेंद्र कटरे म्हणाले की आपल्या समाजात आर्थिक विषमता असून एससी, एसटी समाज बांधवां प्रमाणे आपणाला सुद्धा प्रत्येक क्षेत्रात संविधानानुसार आरक्षण मिळेल.भागवत पाटील नाकाडे म्हणालेत की आपण जरी विविध पक्षांमध्ये काम करीत असलो तरी समाज हित जोपासताना ओबीसीच्या हितासाठी पक्ष बंधने तोडून एकत्र येणे गरजेचे आहे. उद्धव मेहंदळे यांनी म्हणालेत की बांठीया आयोगाच्या शिफारशीनुसार सर्वोच्च न्यायालयाने राजकीय आरक्षण दिले ते सुद्धा विविध जिल्ह्यांमध्ये विषमतेत आरक्षण दिलेले आहे. त्यामध्ये समाजाची लोकसंख्या नेमकी किती हे सुद्धा कळणे कठीण आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये निवडणूक होणाऱ्या 42 ग्रामपंचायतीमध्ये फक्त 13 ग्रामपंचायतीत नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षण मिळालेले आहे. हा ओबीसी जनतेवर अन्यायआहे. यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे.जनगणना हाच शेवटच्या पर्याय असल्याचे ते म्हणाले लायकराम भेंडारकर यांनी जनगननेशिवायआपल्या भविष्यातील पिढीचे भाग्य घडूशकत नसल्याचे म्हणालेत. हेमकृष्ण संग्रामे म्हणाले की प्रत्येक व्यक्ती कोणत्यातरी पक्ष्याशी बांधील असला तरी समाजहित सर्वात मोठे मानून या समाज संघटनेत तन, मन ,धनाने काम करावे. अशोक लंजे ,कैलास भेलावे व इतरांनी सुद्धा संबोधित केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुकुंद अडेवांर,धीरज भिशीकर, संजीव भुरे, विलास चव्हाण, रोशन बडोले, राकेश लंजे व इतर प्रमुख मान्यवर उपस्थित होते .
कार्यक्रमाचे संचालन संभाजी ब्रिगेडचे कृष्णकांत खोटेले तर आभार होमदास ब्राह्मणकर यांनी व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाला मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील तरोणे, लाखांदूरचे सुरेश लंजे ,देवराव कापगते ,रामचंद्र राऊत, वामनराव वझाडे , इंद्रदास झीलपे, बंसीधर लंजे, सुभाष देशमुख, रवींद्र बहेकार, विजयसिंह राठोड, भोजराज रहिले, अजय पशीने ,नंदकिशोर झिलपे, दुर्योधन मैंद, विनोदसिंह बडगुजर, संजय सिंगनजुडे ,पत्रकार संतोष रोकडे, किशोर भाग्यवान,भरत वाढई, एकनाथ ब्राह्मणकर ,दुलाराम मेश्राम, योगेश मैंद ,डॉ.गजानन डोंगरवार ,मंगेश डोये,वैशाली मेंढे अशोक जुगादे ,हेमराज शहारे व मोठ्या संख्येत ओबीसी , व्हिजे,एनटी, एसबीसी चे समाज बांधव उपस्थित होते.