Home विदर्भ सेजगावच्या संस्थेने कर्जदाराला दाखविले गैरकर्जदार?

सेजगावच्या संस्थेने कर्जदाराला दाखविले गैरकर्जदार?

0
 
गोंदिया  दि. ११-: एकीकडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकीत कर्ज वसुलीचे अभियान छेडले आहे. तर दुसरीकडे बँक अधिनस्त असलेल्या विविध सेवा सहकारी संस्थेत सक्तीच्या कर वसुलीला घेवून शेतकरी विवंचनेत आहेत. मात्र, तिरोडा तालुक्यातील सेजगाव येथील विविध कार्यकारी संस्थेत काही सभासदांना त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर असूनही गैरकर्जदार म्हणून दाखविण्यात आले. त्या कर्जदाराने निवडणुकीत भागही घेतला. यामुळे नव्या वादाला तोंड पुâटले आहे. या प्रकरणी ती निवडणूक अथवा त्या सभासदाचे सदस्यत्व रद्द करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी संचालकांनी सहाय्यक निबंधक यांना दिलेल्या तक्रारीतून केली आहे.  
 सेजगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक ११ ऑगस्ट २०१५ ला घेण्यात आली. तत्पूर्वी संस्थेचे गटसचिव व अध्यक्षाने जी उमेदवारांंची यादी सादर केली त्यात महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ (क), (अ) अन्वये अपात्र ठरणाNयांचा त्या यादीत समावेश केला. जेव्हाकी  थकीत कर्ज असल्याने ते निवडणूक लढण्यास अपात्र होते. मात्र, सचिव व अध्यक्षाने या दोघांसह अजून काही सभासदांना कर्ज नसल्याचे सांगून सहाय्यक निबंधक तिरोडा यांचेसह जिल्हा निबंधकांची दिशाभूल केली.
गट सचिवाच्या या निर्णयाने डोक्यावर कर्ज असूनही त्यातील एक उमेदवार निवडणूक जिंवूâन आल्याने त्याचा फटका निवडणुकीत उभ्या असलेल्या दुसNया गटाला भोगावा लागला. ही बाब डिसेंबर व जानेवारी              महिन्यात झालेल्या संस्थेच्या सभेत उघडकीस आली. यावर संचालकांनी संबंधित सचिव व तत्कालीन अध्यक्षाला विचारपूस केली असता नजरचुकीने हा प्रकार घडला असावा, अशी पुष्टी जोडली गेली. परंतु निवडणुकीसाठीच  हा घाट रचल्याची चर्चा सेजगाव परिसरात सुरू झाली आहे. दरम्यान बाधित झालेली निवडणुक प्रक्रिया रद्द करावी अथवा त्या सभासदाचे सदस्यत्व रद्द करून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी संस्थेचे संचालक बंशीलाल पारधी, केशव टेंभरे, शोभेलाल बिसेन, सेवकराम टेंभरे, चुन्नीलाल बिसेन यांनी केली आहे. तेव्हा सहकार क्षेत्रातील संबंधित यंत्रणा या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून दोषींवर कारवाई करणार का? याकडे लक्ष लागले आहे. 

Exit mobile version