नुकसानग्रस्तांना सरसकट मदत द्या आ.विनोद अग्रवाल यांची मुख्यमंत्री शिंदेकडे मागणी

0
32

गोंदिया,दि.19- मागील १५ दिवसापासून झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतपिकाचे नुकसान व अनेक घरांची पड़झड़ झालेली आहे.आ.विनोद अग्रवाल यांनी नुकसानग्रस्त भागात तसेच नुकसानग्रस्तांना प्रत्यक्ष भेट देऊन सर्व नुकसानग्रस्तांना व शेतक-यांना तसेच पीडितांना सरसकट मदद मिळावी या मागणीसाठी आ.विनोद अग्रवाल यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेट देऊन मागणी केली आहे.या अतिवृष्टी पावसामुळे अनेक शेतक-यांचे शेतपीक पाण्यामध्ये बुडून गेले असून त्यांचे पूर्ण नुकसान झालेले आहेत व मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने शेतात साचलेल्या पाण्यामुळे १०० टक्के पीकही खराब होणार असून पिकाचे उत्पादन हवे तसे होणार नाही.तसेच ज्या ठिकाणी पानी साचलेले नाही त्या ठिकाणी सुद्धा ५० टक्के शेतपीकाचे नुकसान झालेले आहे. शेतक-यांना मोठी नुकसानी सहन करावे लागणार आहे.त्यासाठी शेतक-यांना नुकसानी वाढवून देणे गरजेचे आहे.या साठी सरसकट सर्व शेतक-यांना मदद दिले पाहिजे.तसेच या पावसामुळे अनेक बंधारे सुद्धा वाहून गेले आहेत. त्यांच्या दुरुस्ती किंवा निर्माण करणे आवश्यक आहे.पावसामुळे अनेक लोकांच्या घराची पड़झड झालेली आहे.त्यात भिंत छत व पूर्णपणे मातीमध्ये बदलले आहेत.व पावसाचे पानी घरात शिरले आहे.त्यामुळे घर पूर्णपणे क्षतिग्रस्त झालेले आहेत. व घरे राहणे योग्य नसल्याने त्यांना आवास योजनेचे लाभासाठी प्राधान्य देण्यात यांवे. व त्यांना अंशता मदद न करता पूर्णता मदद देऊन सांत्वना दिली पाहिजे. अतिवृष्टी पावसात पाळीव जनावरांचे गोठ्यांची सुद्धा पड़झड झालेली आहे व त्यात जनावर सुद्धा मृत्युमुखी पडले आहेत तसेच जनावरांचे खाद्य, चारा हे सर्व त्यात नष्ट झालेले आहे. त्यांना त्याप्रमाणे नुकसानी दिल्यास त्यांना आर्थिक मदद होईल.सतत पावसाने रस्त्यामध्ये मोठे -मोठे खड्डे निर्माण झालेले आहेत त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नकारता येत नाही व रस्त्यांची व पुलांची अवस्था फारच दयनीय झालेली आहे त्यासाठी सदर रस्त्यांचा निर्माणसाठी निधी उपलब्ध करून देण्यात यांवे जेणेकरून नवीन रस्ते चे व पुलांचे बांधकाम व रस्त्यांची दुरुस्ती करता येईल. जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पुर परिस्थिती असल्याने पुरात वाहून गेल्याने त्यांच्या मृत्यु झालेले आहेत व विजेचा कनेक्शनमुळे सुद्धा अपघात झालेले आहे. त्यांच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदद देणे अत्यंत गरजेचे आहे. अश्या बऱ्याच मागणी आ.विनोद अग्रवाल यांनी राज्याचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांना भेट देऊन केली आहे.