
गोंदिया-आरोग्य सेवा देताना केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्य सेविका निलम शुक्ला यांचा जिल्हाधिकारी नयना गुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात प्रशस्तीपत्र देऊन निलम शुक्ला यांना सन्मानित करण्यात आले.
पोलिस मुख्यालय गोंदिया येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आरोग्य क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल शासकीय वैद्यकीय महाविद्यायात आरोग्यसेविका (ओपीडी) निलम शुक्ला यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून सम्मानित करण्यात आले. सन्मानित झाल्याबद्दल वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर, आरोग्यसेविका, कर्मचार्यांच्यावतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.