जातीयवादी मानसिकतेतून अमानवीय कृत्याचा बळी ठरलेल्या निरागस बालकाला न्याय दया – सार्वभौम युवा मंच

0
17
लाखनी :- राजस्थानमधील जालौर येथील शाळा शिक्षकाने अनुसूचित जाती प्रवर्गातील एका नऊ वर्षीय निरागस मुलाने त्याच्या मडक्यातील पाणी पिले म्हणून बेदम मारहाण केली. ही घटना 22 जुलै रोजी घडली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव दिनाच्या पूर्व संध्येला त्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण भारतामध्ये खळबळ उडालेली आहे. या घटनेचे तीव्र प्रतिसाद महाराष्ट्र राज्यातही उमटलेले आहेत.
लाखनी शहरात सार्वभौम युवा मंच जि.भंडारा या सामाजिक संघटनेने बुधवारी सायंकाळी शोक सभा घेत, गुरुवारी तहसिल कार्यालयावर मोर्चा काढीत या अमानवी कृत्याचा जाहीर निषेध केला. “राजस्थान सरकार होश मे आओ”, “राहुल प्रियंका जवाब दो”, “इंद्र मेघवाल को इंसाफ दो” अश्या प्रकारच्या नारेबाजी ने संपूर्ण शहराचा लक्ष वेधून घेतला. ह्यावेळी राजस्थान सरकार चा प्रतिकात्मक पुतळा दहन करून , ह्या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला.
अलीकडे जातीयवाद संपला असे जाहीर सांगण्यात येते परंतु गतकाळातील व अलीकडील घटनांचा आढावा घेतला तर वर्तमानातही अनुसूचित जाती-जमाती वर अत्याचार होण्याचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. राजस्थानमध्ये धर्मनिरपेक्षवादाचा पुरस्कार करणाऱ्या काँग्रेसचे सरकार आहे, असे असतानाही राज्यात जातीयवादाने आपली मान उंचावलेली आहे. यावरून असे दिसते की आजही या देशात अस्पृश्य म्हणून गणल्या गेलेल्या समाजाला सन्मानाचे जगणे नाही. समतावादी समाजाने या घटनेचा तीव्र निषेध करीत जगाच्या पटलावर या निंदनीय घटनेला विचारात घेतल्या जाईल या दिशेने पाऊले उचलावीत तसेच संपूर्ण शक्ती एकवटून धर्मांध व जातीयवादी शक्तींना नेस्तनाबूत करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी असे मत सार्वभौम युवा मंच जि.भंडारा चे अध्यक्ष दिपक जनबंधू यांनी ह्या निषेध मोरच्यात मांडले. पिरिपा चे तालुकाध्यक्ष सुरेंद्र बंसोड यांनी घटनेचा तीव्र निषेध करत सांगितले की 1927 साली डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचा आंदोलन करून एक मोठी क्रांती केली होती. परंतु पुन्हा त्याच प्रकारच्या विषमतेचे चित्र देशात निर्माण होत आहे, ह्याचा खेद व्यक्त केला.
सार्वभौम च्या संघटिका अश्विनी भिवगडे यांनी ह्या घटनेचा निषेध व्यक्त करीत आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली, व बिलकीस बानो प्रकरणात आरोपींना सुटका मिळाली, ह्या गोष्टीचा सुद्धा निषेध केला. सामाजिक कार्यकर्ते दिलीप बडोले यांनी घटनेचा निषेध व्यक्त करीत सर्व समाजाने एकत्रित येऊन ह्या विषमतेच्या विरोधात एकत्र येऊन लढा दिला पाहिजे, असा आव्हान केला.
घडलेल्या घटनेचा नाटकीय दृश्य निर्माण करून, सर्व जनतेसमोर ही घटना मांडण्यात आली. आरोपी छैल सिंह ला फाशीची शिक्षा द्या, पीडित कुटुंबातील 2 व्यक्तींना शासकीय नोकरी व 50 लाखांची आर्थिक मदत करावी, अश्या मागणींचे निवेदन तहसीलदार मार्फत राष्ट्रपती महोदयांना पाठविण्यात आले.
ह्याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष दिपक जनबंधु, जिल्हा परिषद सदस्या सुर्मिला पटले, अश्विनी भिवगडे, नेहाल कांबळे, अशोक पटले, सुरेंद्र बंसोड, दिलीप बडोले, योगेश कांबळे, पवन गजभिये, शुभम खवसकर, प्रा.विजय रंगारी, अंकित कांबळे, दिनेश शामकुवर, कृपाल मेश्राम, जयप्रकाश शामकुवर, निहाल वालदे, प्रणय शामकुवर, आकाश बडगे, राकेश वंजारी, शर्वरी भिवगडे, प्राची गंधे, प्रीती खोब्रागडे, राईबाई कांबळे, अनिता जनबंधु, बबिता शामकुवर, फुलन रामटेके, विकास गडकरी, संयोग भिवगडे, विमल देवनाथ, विकास शामकुवर, प्रीतम वासनिक, शशिकांत रामटेके, श्रीकांत नागदेवे, दामोधर राणे, विश्वजित गणवीर, परमानंद मेणपाले, नागेश्वर चेटूले, निखिल चेटूले आदी उपस्थित होते.