
तुमसर: शहरात काही दिवसापूर्वी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाले तर काही लोकांचे घरही पाण्यामुळे पडले. असाच एक प्रकार मोठा बाजार परिसरातील माता नगर येथील मुकेश मलेवार यांच्या घरी पाहायला मिळाला. यांचे मातीचे बांधकाम असलेल्या घराची भिंत मुसळधार पाऊस आल्याने कोसळली होती. सुदैवाने यात कुणालाही दुखापत झाली नाही.
हे परिवार मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्यांच्या घराचे बांधकाम हे माती-दगडांचे होते.
तुमसर येथे तीन दिवस मुसळधार पाऊस सुरू होते. त्यामुळे मलेवार यांच्या घराच्या भिंतीतही पावसाचे पाणी मुरल्याने माती सैल झाली. त्यातच मंगळवारी दुपारी त्यांची पत्नी स्वयंपाक घरात असताना घराची भिंत कोसळली. माती पडायला सुरुवात हाेताच ति घरातून बाहेर निघाल्यामुळे जीवितहानी टळली. मुकेश मलेवार यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता यासिन छवारे यांनी पुढाकार घेत आर्थिक मदत केली.
या प्रसंगी राजमुद्रा ग्रुप संस्थापक अध्यक्ष इंजि.सागर गभने यांनी सांगितले की आम्ही माणुसकी जपण्याच्या प्रयत्नात आहोत परंतु शासनाने सुद्धा याकडे लक्ष देण्याची गरज आहे. यावेळी प्रवीण भुरे, अवी पटले, मुकेश मलेवार उपस्थित होते.