BLO कामातून मुक्त करा- महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना समिती

0
46

गोरेगाव,दि.20-महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना समिती गोरेगावच्या शिष्टमंडळाने तहसिलदार गोसावी,नायब तहसीलदार चांदेवार यांना निवेदन देऊन  BLO कामातून सर्व प्राथमिक शिक्षक यांना मुक्त करण्याची मागणी केली.कूराडी शाळेतील शिक्षकाला वैयक्तिक भेटुन महसूल विभागाचे कर्मचारी यांनी केलेला प्रकार निंदनीय आहे.याबातीत संबंधित कर्मचारी यांचा निषेध करण्यात आला.यानंतर कुणाला ही वैयक्तिक भेटून कुणी लेखी मागल्यास संघटनेला कळवण्याचे आवाहन अध्यक्ष उत्तम टेंभरे यांनी केले. BLO शिक्षकांची मागणी पूर्ण करण्यासाठी एकत्र आलेले शिक्षकांमध्ये जिल्हा उपाध्यक्ष परमानंद खोब्रागडे, सरचिटणीस हरिराम येळणे, तालुका नेते विजय नेवारे, समितीचे संघटक उमेश रहांगडाले,शिक्षक भारती मावळे नृपराज शेडे,बगमारे, महिला मंच सदस्य कु. प्रेमलता बघेले (टेंभरे), सुभाष बोपचे,डोमळे मैडम, हेमंत कावळे,शेंडेर,वलथरे,डोंगरे व संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी सरपंच संघटनेचे निवेदन देण्यात आले.