अत्याधुनिक औषधी फवारणी यंत्र प्रदर्शनीचे माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते उदघाटन

0
42

गोंदिया,दि.02ः- तालुक्यातील पांढराबोडी गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँक, गोंदिया व माऊली ग्रीन आर्मी महाराष्ट्र राज्य पर्यावरण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गरुडा एरोस्पेस किसान ड्रोन द्वारे अत्याधुनिक औषधी फवारणी यंत्र प्रदर्शनीचे उदघाटन माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते आज पार पडले. शेतकरी अधिक सक्षम व समृद्ध करण्याच्या दृष्टीने शेतीचे यांत्रिकीकरण व प्रोत्साहन देण्यासाठी शेती मधील विविध पिकांवर हवाई फवारणी करीता ड्रोनचा वापर केला जाणार आहे. या ड्रोन फवारणीमुळे शेतकऱ्यांचा वेळ व पैशाची बचत सुद्धा होणार आहे.उदघाटन प्रसंगी माजी आमदार राजेंद्र जैन, मनीषा नागलवाडे,उपसभापती निरज उपवंशी, धुरानलाल सुलाखे, चंदन गजभिये, ईमलाबाई चुलपार, ईदल सिहारे, सुनिल पटले, रितारामजी लिल्हारे, राजेश नागपुरे, इंद्रकुमार चुलपार, रणजीतसिंह नागपुरे, रौनक ठाकुर सहित मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.