तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात तब्बल 34 वर्षे सेवा देणार्‍या सफाई कर्मचार्‍याचा सेवानिवृत्तीपर सत्कार

0
18

तिरोडा, दि.2 : राजू गुनेरिया (सफाई कर्मचारी) हे 31 ऑगस्ट 2022 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आज 02 सप्टेंबर 2022 रोजी तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ.हिंमत मेश्राम यांच्या मार्गदर्शनात सेवानिवृत्तीपर सत्कार करण्यात आला. त्यांनी तब्बल 34 वर्षे अखंड सेवा दिली असून आता सेवानिवृत्त झाल्याने त्यांना निरोप देण्यात आला.

सेवानिवृत्तीपर सत्कार

तिरोडा उपजिल्हा रुग्णालय नेहमी स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी आम्ही त्यांना आणि त्यांच्या सेवांना सलाम करतो, असे प्रतिपादन डॉ.हिंमत मेश्राम यांनी केले.

वर्ष 2016-17 मध्ये कायाकल्प कार्यक्रमात राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार आणि 2019-20 मध्ये कायाकल्प कार्यक्रमात राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार तसेच लक्ष्य कार्यक्रमात राष्ट्रीय स्तरावरील प्रमाणपत्र पुरस्कार जिंकण्यात त्यांचा मोठा वाटा आणि योगदान आहे. वर्ष 2018-19 आणि वर्ष 2019-20 मध्ये NQAS कार्यक्रमातही त्यांचा मोलाचा वाटा आहे, असेही डॉ.मेश्राम यांनी सांगितले.

सेवानिवृत्तीपर सत्कार

राजू गुणेरिया यांना शाल, श्रीफल व पुष्पगुच्छ देवून त्यांना निवृत्तीनंतरच्या निरोगी आणि उत्तम आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी तिरोडा उपजिल्हा रुग्णालयातील संपूर्ण स्टाफ उपस्थित होता.